महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Atiq Ashraf Buried : अतिक आणि अशरफचा अखेर अंत, मृतदेह कसारी मसारी दफनविधीत केले दफन

अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांचे मृतदेह आज सायंकाळी 8.30 वाजता प्रयागराजच्या स्मशानभूमीत पुरण्यात आले आहेत. अंत्यसंस्काराला अतिकची पत्नी शाइस्ता परवीनही उपस्थित असल्याचे बोलले जात आहे, मात्र पोलिसांनी अद्याप याला दुजोरा दिलेला नाही.

Atiq Ashraf
अतिक अहमद आणि अशरफ

By

Published : Apr 16, 2023, 7:57 PM IST

Updated : Apr 16, 2023, 10:47 PM IST

प्रयागराज : अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांना प्रयागराज येथील कासारी मसारी दफनभूमीत पुरण्यात आले आहे. यावेळी अतिकची दोन्ही अल्पवयीन मुले आणि अशरफच्या दोन्ही मुली उपस्थित होत्या. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फोजफाटा तैनात आहे.

शाइस्ता परवीनही स्मशानभूमीत पोहचली? : आज सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर अतिक आणि अशरफ यांचे मृतदेह थेट कासारी - मासारी स्मशानभूमीत नेण्यात आले. यावेळी अतिकचे 20 ते 25 नातेवाईक तेथे उपस्थित होते. स्मशानभूमीत पोहोचलेल्या सर्व बुरखाधारी महिलांची तपासणी महिला पोलीसांनी केली. यावेळी अतिक अहमद याच्या दोन्ही अल्पवयीन मुलांना पोलिसांच्या संरक्षणात स्मशानभूमीत आणण्यात आले. त्याचवेळी अशरफ याच्या दोन्ही मुलींनाही स्मशानभूमीत आणण्यात आले होते. त्याच वेळी तीन बुरखा घातलेल्या महिला स्मशानभूमीत पोहोचल्या. त्यात एक शाइस्ता परवीन असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी मात्र अद्याप याला दुजोरा दिलेला नाही.

स्मशानाभूमीत जाण्यासाठी पोलिसांशी झटापट : अतिक अहमद आणि अशरफ अहमदच्या अंत्यसंस्काराच्या वेळी पोलिसांनी सुमारे 100 हून अधिक लोकांना कासारी - मासारी स्मशानभूमीत प्रवेश दिला. मात्र अनेकांना पोलिसांनी बाहेरच थांबवले होते. यावेळी प्रवेश न दिल्याने त्या लोकांचा पोलिसांशी जोरदार वाद झाला. त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी स्मशानभूमीभोवती मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात केला होता. यावेळी स्मशानभूमीच्या गेटवरच अनेकांना थांबवण्यात आले होते.

मारेकऱ्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी : अतिक अहमद आणि अशरफ यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करणारे सनी सिंग, अरुण मौर्य आणि लवलेश तिवारी या तीन शूटर्सना यांना आज प्रयागराज न्यायालयाने आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. काल या दोघांचा खून केल्यानंतर या तिघांनीही पोलिसांसमोर शरणागती पत्कारली होती. पेशीदरम्यान न्यायालयात चोख बंदोबस्त करण्यात आला होता. सर्व मीडियाकर्मींना यावेळी एंट्री बॅन करण्यात आली होती.

हे ही वाचा :Killers Of Atiq Ashraf Ahmed : अतिक-अशरफच्या मारेकऱ्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Last Updated : Apr 16, 2023, 10:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details