हैदराबाद: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा 25 डिसेंबर 1924 रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे जन्म झाला. त्यांनी देशाच्या विकासासाठी दिलेलं योगदान लक्षात घेता मोदी सरकारनं 2014 मध्ये त्यांची जयंती हा 'सुशासन दिन' म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला. याच कारणां संपूर्ण देशात दरवर्षी २५ डिसेंबर हा दिवस सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त सरकारी पातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी 'एक्स' सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले की, देशाच्या वतीने मी माजी पंतप्रधान आदरणीय अटलबिहारी वाजपेयी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो. त्यांनी आयुष्यभर राष्ट्र उभारणीसाठी कार्य केले. भारत मातेसाठी त्यांचे समर्पण आणि सेवा हे कायम प्रेरणास्थान राहणार आहे.
- देशातील सुशासन सुधारण्यासाठी सरकारच्या वतीनं विविध निर्णय घेण्यात येत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरसाठी प्रायोगिक जिल्हा सुशासन निर्देशांक (DGGI) लाँच केला आहे. भविष्यात देशातील प्रत्येक जिल्ह्याचा जिल्हा सुशासन निर्देशांक जाहीर होणार आहे.
देशासमोर सुशासनाची ही आहेत आव्हाने:
- महिला सक्षमीकरणाच्या अंमलबजावणीतील अडथळे
- वाढत्या भ्रष्टाचाराची समस्या
- जलद न्याय मिळण्याच्या अधिकाराचा वापर करण्यात अडथळा
- भ्रष्टाचाराच्या खटल्यांच्या सुनावणीत प्राधान्याचा अभाव असणे
- प्रशासकीय यंत्रणेतील त्रुटी
- राजकारणात गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या लोकांचा सहभाग
या पुरस्कारांनी अटलबिहारी वाजपेयींचा झाला होता गौरव
- 1992: 'पद्मविभूषण', भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार
- 1993: कानपूर विद्यापीठातून साहित्यात डॉक्टरेट पदवी
- 1994: लोकमान्य टिळक पुरस्कार
- 1994: उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार
- 1994: भारतरत्न पंडित गोविंद वल्लभ पंत पुरस्कार
- 2015: 'भारतरत्न', भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार
- 2015: बांग्लादेश मुक्तिजुधो सन्मानोना (बांगलादेश मुक्तियुद्ध पुरस्कार), बांगलादेश सरकारने दिलेला सर्वोच्च पुरस्कार
अटलबिहारी वाजपेयींच्या आयुष्यााबाबत काही रंजक गोष्टी
- 'भारत छोडो' आंदोलनात भाग घेतल्याबद्दल त्यांना 23 दिवस तुरुंगात काढावे लागले.
- संयुक्त राष्ट्र महासभेत हिंदीत भाषण करणारे अटलबिहारी वाजपेयी हे पहिले भारतीय राजकारणी होते.
- उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, नवी दिल्ली आणि गुजरात या चार राज्यांतील 6 लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला होता.
- अटलबिहारी वाजपेयी हे 47 वर्षे खासदार होते. त्यापैकी ते 11 वेळा लोकसभेचे आणि 2 वेळा राज्यसभेचे सदस्य होते.
- देशाचे पंतप्रधान होणारे ते भाजपाचे पहिले नेता होते.
- अटलबिहारी वाजपेयींनी तीनवेळा पंतप्रधान म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यांनी 1996 मध्ये 13 दिवसांचे पंतप्रधानपद भूषविले. 1998 ते 1999 या कालावधीत 13 महिन्यांकरिता पंतप्रधानपद भूषविले. तिसऱ्यांदा 1999 ते 2004 या काळात त्यांनी पंतप्रधान पदाचा कार्यकाळ पूर्ण केला.
- 1998 मध्ये भारतानं राजस्थानमधील पोखरण येथे यशस्वी अणुचाचणी केली. या चाचणीतून भारताला आण्विक महाशक्ती म्हणून ओळखलं जाऊ लागले. तर अणुचाचणीला 'ऑपरेशन शक्ती' म्हणून ओळखले जाते.
- अटलबिहारी वाजपेयी अविवाहित होते. कामात वेळ मिळाला नसल्यानं विवाह करण्यासाठी वेळ मिळाला नसल्याचं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.
- 2009 मध्ये पक्षाघातामुळे वाजपेयींना शारीरिक आजाराला सामोरं जावं लागले. त्यांना आवाज आणि हाताची हालचाल करताना अडथळा झाला होता.
- काही वर्षे आजारी राहिल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांचे 16 ऑगस्ट 2018 रोजी नवी दिल्लीत एम्स येथे निधन झाले.
- अटलबिहारी वाजपेयी यांची कवी म्हणून स्वतंत्र ओळख होती. दहावीत असताना त्यांनी पहिली कविता रचली असे म्हणतात. जगजीत सिंग यांनी गायलेले 2 अल्बमदेखील रिलीज केले.
- 2005 मध्ये वाजपेयींनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली.
- डिसेंबर २०१४ मध्ये अटलबिहारींना 'भारतरत्न' हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- विनायक दामोदर सावरकर यांच्या अनेक कविता त्यांनी मराठीतून हिंदीत अनुवादित केल्या होत्या.
- राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी 'राष्ट्रधर्म' आणि 'पांचजन्य' या दोन मासिकांचे त्यांनी संपादन केले होते.
हेही वाचा