महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

...म्हणून राहुल गांधी संसदीय समितीच्या बैठकीतून पडले बाहेर - parliament panel meet

राहुल गांधी यांनी पाकिस्तान आणि चीनशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्याची संसदीय समितीमध्ये मागणी केली. त्यावर संसदीय समितीचे चेअरमन जुआल ओरम यांनी चर्चा करण्याची परवानगी दिली नाही. हा समितीच्या अजेंड्यावरील विषय नसल्याचे ओरम यांनी सांगितले.

राहुल गांधी
राहुल गांधी

By

Published : Jul 14, 2021, 9:57 PM IST

नवी दिल्ली - संसदीय समितीच्या बैठकीत देशाच्या संरक्षणा संदर्भात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काही प्रश्न उपस्थित केले. त्या प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी केली. मात्र, ही मागणी संसदीय समितीच्या चेअरमनने मान्य केली नाही. त्यावर राहुल गांधी हे बैठकीतून बाहेर पडले.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पाकिस्तान आणि चीनशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्याची संसदीय समितीमध्ये मागणी केली. त्यावर संसदीय समितीचे चेअरमन जुआल ओरम यांनी चर्चा करण्याची परवानगी दिली नाही. हा समितीच्या अजेंड्यावरील विषय नसल्याचे ओरम यांनी सांगितले.

हेही वाचा-पंजाब सरकारकडून 2.85 लाख शेतमजूर आणि भूमिहीन शेतकऱ्यांना कर्जमाफी

राहुल गांधींनी ही केली मागणी-

संसदीय समितीने अत्यंत महत्त्वाच्या आणि संबंधित मुदद्यावर जाणीवपूर्वक चर्चा करावी, असा राहुल गांधी यांनी संसदीय समितीच्या बैठकीत आग्रह धरला. यामध्ये पूर्व लडाखमध्ये चीनबरोबर असलेली स्थिती आणि पाकिस्तानकडून असलेला दहशतवाद्याचा धोका अशा मुद्द्यांचा समावेश होता. तालिबानी हे अफगाणिस्तानचा ताबा घेत आहेत, हा प्रश्नही गांधी यांनी बैठकीत उपस्थित केला. याचबरोबर चीनचा श्रीलंकेत वाढता प्रभाव आणि त्याचा भारताच्या विकासावर होणार परिणाम याकडे राहुल गांधी यांनी लक्ष वेधले. हे प्रश्न अत्यंत गंभीर असल्याने त्यावर संसदीय समितीने तातडीने चर्चा करावी, अशी राहुल गांधी यांनी आग्रहाची मागणी केली.

हेही वाचा-पीयूष गोयल यांची राज्यसभेच्या सभागृहनेते पदी निवड

संसदीय समितीचे चेअमन ओराम यांनी राहुल गांधींची फेटाळली मागणी-

समितीचे चेअरमन ओराम यांनी समिती ही केवळ कँटोन्टमेंट बोर्डाच्या कामाबाबत चर्चा करणार असल्याचे सांगितले. जर सदस्याला चर्चा करायची असेल तर त्याने 14 दिवस नोटीस बजावून प्रक्रियेचे पालन करावे, असे ओराम यांनी सांगितले. संसदीय समितीच्या मागील बैठकीला गांधी किंवा काँग्रेसचा कोणताही सदस्य बैठकीला उपस्थित नव्हता. अन्यथा ते मुद्दे चर्चेत घेणे शक्य झाले असते, असे संसदीय समितीच्या चेअरमन ओराम यांनी सांगितले. राहुल गांधी यांचे उत्तराने समाधान झाले नाही. ते बैठकीतून निघून गेले. त्यानंतर समितीचे 90 मिनिटे कामकाज चालले.

हेही वाचा-उत्तर प्रदेशमध्ये अलकायदाच्या आणखी तीन दहशतवाद्यांना अटक

ABOUT THE AUTHOR

...view details