चेन्नई :लखनऊ ते रामेश्वरम या पर्यटक रेल्वे गाडीच्या कोचला लागलेल्या आगीत ९ प्रवाशांचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही गाडी मदुराई रेल्वे स्थानक सोडून एक किमी अंतरावर उभी होती. लखनऊ ते रामेश्वरम प्रवासास निघालेली ही गाडी मदुराई स्थानकात विसाव्यासाठी थांबण्यात आली होती. मात्र अचानक डब्याला आग लागल्यानं मोठी खळबळ उडाली. यात अगोदर दोन प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आगीत मृत्यू झालेल्यांची संख्या ९ वर पोहोचली आहे. मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
चहा बनवत होते पर्यटक :पर्यटकांच्या रेल्वे गाडीतील डब्याला आगीनं वेढल्यानं ९ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ही घटना मदुराई रेल्वे स्थानकावर घडली आहे. या रेल्वेतील प्रवाशी गॅस सिलिंडरवर चहा बनवत होते. मात्र चहा बनवत असताना पोर्टेबल गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आग लागल्याची घटना घडल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे.
लखनऊ ते रामेश्वरम पर्यटकांची रेल्वे गाडी :ही रेल्वे गाडी लखनऊ येथून काही पर्यटकांना घेऊन रामेश्वरमला निघाला होती. मात्र मदुराई स्थानकात ही रेल्वे गाडी थांबवण्यात आली होती. या रेल्वे गाडीत उत्तर प्रदेशातील अनेक प्रवाशी प्रवास करत होते. थांबा असल्यानं मदुराई स्थानकात काीह अंतरावर ही रेल्वेगाडी फलाटावर थांबवण्यात आली होती. मात्र चहा बनवताना ही घटना घडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.