महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मध्य प्रदेश छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान, भाजपा-काँग्रेसमध्ये चुरशीची लढत - BJP Congress fierce fight

Assembly Elections 2023 : मध्य प्रदेश तसंच छत्तीसगडमध्ये आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. यावेळी मतदारांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. या दोन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष (भाजपा) तसंच काँग्रेस यांच्यात मुख्य लढत आहे.

Assembly Elections 2023
Assembly Elections 2023

By ANI

Published : Nov 17, 2023, 8:29 AM IST

Updated : Nov 17, 2023, 2:35 PM IST

नवी दिल्ली :मध्य प्रदेशच्या सर्व 230 विधानसभा जागांसाठी तसंच छत्तीसगडच्या 70 निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज मतदान होत आहे. या दोन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष तसंच काँग्रेस यांच्यात मुख्य लढत आहे. मध्य प्रदेशात सध्या भाजपाची सत्ता आहे, तर छत्तीसगडमध्ये पुन्हा काँग्रेस सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. मध्य प्रदेश तसंच छत्तीसगड या दोन्ही राज्यांमध्ये भाजपानं मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहिर केलेला नाहीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यांच्या नावावरच भाजपा इथं निवडणूक लढवत आहे.

  • तरुणामध्ये मतदानाचा उत्साह : मध्य प्रदेशमध्ये आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. यात मांडला येथील खडदेवरात कैलास ठाकूर पहिल्यादाच मतदार करणार आहे. कैलास ठाकूरची उंची अडीच फूटापेक्षाही कमी असून त्यानं नुकतीच वयाची 18 वर्षे पूर्ण केली आहे. मी आज पहिल्यांदाच मतदान करणार आहे. त्यामुळं खूपच उत्साही असल्याचं कैलासनं यावेळी बोलताना सांगितलंय.

बंडखोरीमुळं कमलनाथ यांचं सरकार कोसळलं :मध्य प्रदेशात गेल्या 20 वर्षांपैकी जवळपास 18 वर्षे भाजपाची सत्ता आहे. कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार मार्च 2020 सत्तेत होतं. राज्यात त्यांच सरकार केवळ 15 महिने टिकलं. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या बंडखोरीमुळं कमलनाथ यांचं सरकार कोसळलं होतं. ज्यामध्ये त्यांच्याशी निष्ठावान असलेल्या 22 आमदारांनी राजीनामा दिला होता. आता मध्य प्रदेशात काँग्रेस पुन्हा एकदा कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारला हटवण्याचा प्रयत्न करणार आहे.

काही बूथवर दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान :मध्य प्रदेशात सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे. मात्र, बालाघाट जिल्ह्यातील बैहार, लांजी, परसवारा विधानसभा मतदारसंघ, मांडला तसंच दिंडोरी जिल्ह्यातील काही बूथवर दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. भाजपानं राज्यात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना मुख्यमंत्रिपदासाठी यांच्या नावाची अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र दुसरीकडं काँग्रेसनं कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करणार असल्याचं जवळपास निश्चित आहे.

  • काँग्रेसची सत्ता बदलण्याचा भाजपाचा प्रयत्न : शिवराज सिंह चौहान यांना वैयक्तिकरित्या विरोधाचा सामना करावा लागत नसला तरी, छत्तीसगडमध्ये लोकसंख्येच्या काही भागांमध्ये परिवर्तनाची करण्याची गरज असल्याच्या बातम्या आल्या आहेत. 2003 ते 2018 या काळात राज्यात सातत्यानं सत्ता गाजवणाऱ्या काँग्रेसची सत्ता बदलण्याचा भाजपा प्रयत्न करत आहे.
  • पहिल्या टप्प्यात चांगली कामगिरी :छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखाली राज्यात पहिल्या टप्प्यातील 20 जागांसाठी 7 नोव्हेंबर रोजी मतदान झालं होतं. दोन्ही पक्षांनी पहिल्या टप्प्यात चांगली कामगिरी केल्याचा दावा केला होता. 2018 च्या निवडणुकीत 70 जागांवर काँग्रेस काँग्रेस आघाडीवर होतं. त्यापैकी 51 जागा काँग्रेसनं जिंकल्या होत्या.

दुसऱ्या टप्यात 958 उमेदवार रिंगणात :छत्तीसगडमध्येही मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना काँग्रेसनं मुख्यमंत्री पदाचे अधिकृत उमेदवार म्हणुन घोषित केलंल नाहीय. तसंच भाजपानं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावरच निवडणुकीचा प्रचार केलाय. छत्तीसगडमध्ये या टप्प्यात 958 उमेदवार रिंगणात आहेत. भूपेश बघेल, विधानसभेचे अध्यक्ष चरणदास महंत, उपमुख्यमंत्री टीएस सिंह देव, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष अरुण साओ हे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत. या टप्प्यातील मतदानासाठी राज्यात 18 हजारांहून अधिक मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. यापैकी 727 'संगवारी' बूथ आहेत. तिथं महिला मतदान कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

हेही वाचा -

  1. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर ठाकरे-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले
  2. Balasaheb Thackeray Death Anniversary: व्यंगचित्रकार ते हिंदुत्त्वाचा बुलंद आवाज! 'असा' राहिला बाळासाहेब ठाकरेंचा जीवन प्रवास
  3. मतदारांनी नाकारलं तर उद्या ते त्यांच्या विरोधातही बोलतील, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Last Updated : Nov 17, 2023, 2:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details