बंगळुरू- बागलकोट जिल्ह्यात एका महिला वकिलावर झालेल्या ( incident of assault on a lawyer ) जीवघेणा हल्ल्यातील आरोपी महांतेश चोलचागुड्डा याला कर्नाटक पोलिसांनी ( Karnataka Police ) अटक केली आहे. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली. या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात आरोपी महिला वकिलाला लाथा मारताना, चापट मारताना आणि मारहाण करताना दिसत आहेत. आरोपीने महिलेच्या पतीलाही मारहाण केली आहे.
बायोकॉनचे प्रमुख किरण मुझुमदार-शॉ यांनी देखील सोशल मीडियाद्वारे या घटनेवर प्रतिक्रिया ( Kiran Muzumdar Shaw on lawyer video ) व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की अशा घृणास्पद वर्तनासाठी त्या व्यक्तीला ( Assault on Lawyer in Karnataka ) अटक केली पाहिजे. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी म्हटे की, तो सुसंस्कृत माणूस नसून प्राणी आहे. त्याचवेळी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी 40 वर्षीय महांतेश चोलचगुड्डा याला ( woman lawyer in Bagalkot district ) अटक केली.
भाजप नेते राजू नायकर यांचा आरोपीला पाठिंबा-स्थानिक भाजप नेते राजू नायकर यांच्या पाठिंब्याने आरोपी महांतेश चोलचागुड्डा याने त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप वकील संगीता यांनी केला आहे. भाजप नेते राजू नायकर यांनी संगीता घराशेजारील कंपाऊंड आणि शौचालय ८ मे रोजी बुलडोझरने पाडले. हे कंपाऊंड पाडण्याचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. याबाबत मी राजू नायकर यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तर जाणून घ्या महांतेश चोलचागुड्डा याने राजू नायकरच्या पाठिंब्याने माझ्यावर प्राणघातक हल्ला केला, असा आरोप वकिलाने केला आहे.