ऐझॉल - हिंसाचार उफाळल्याने आसाम-मिझोरम सीमेवरील तणाव आणखीच वाढला आहे. मिझोरमच्या पोलिसांनी कोलासिब जिल्ह्यातील वैरेंगते नगरात झालेल्या हिंसा प्रकरणात आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा, राज्य पोलीस दलातील चार अधिकारी आणि अन्य दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच आसामच्या 200 अज्ञात पोलीस कर्मचऱयांविरोधात खटला दाखल केला आहे. तर आसामच्या पोलिसांनी मिझोरमच्या एका राज्यसभा सदस्याला आणि अन्य सहा जणांना नोटीस बजावली आहे.
गेल्या सोमवारी वादग्रस्त आसाम-मिझोरम सीमेवर हिंसाचार भडकला होता. आसाममधील कछार जिल्हा आणि मिझोरम कोलासिब जिल्ह्याच्या सीमेवरील भागात गोळीबार झाला. यामध्ये 6 जवान ठार झाल्याची माहिती आहे. घटनेनंतर गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करुन घटनेची संपूर्ण माहिती घेतली. दोन्ही राज्यांनी सीमावादावर शांतीने मार्ग काढण्याचे गृहमंत्र्यांनी आवाहन केले.
आसाम सरकारने मिझोरमबरोबरील सीमा वादानंतर तीन दिवस राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. सीमावादात मृत्यू पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत करण्याची आसाम सरकारने घोषणा केली आहे. तर जखमींना प्रत्येकी एक लाख रुपये दिले जाणार आहे.
अमित शाह टीकचे धनी -