महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 29, 2022, 10:21 AM IST

ETV Bharat / bharat

Assam Police detained 11 persons connected to Al Qaeda: आसाम पोलिसांनी अल कायदाशी संबंधित 11 जणांना घेतले ताब्यात

आसाम पोलिसांनी मोरीगाव, बारपेटा, गुवाहाटी आणि गोलपारा जिल्ह्यातून 11 जणांना ताब्यात घेतले. ते इस्लामिक कट्टरतावादाशी जोडलेले आहेत (Assam Police detained 11 persons). जागतिक दहशतवादी संघटना अल-कायदा (Al Qaeda) इन इंडियन सबकॉन्टिनेंट (AQIS) आणि अन्सारुल्ला बांग्ला टीम (ABT) यांच्याशी संबंध आहेत. याबाबत पुढील कार्यवाही सुरू आहे.

11 जणांना घेतले ताब्यात
11 जणांना घेतले ताब्यात

गुवाहाटी -आसाम पोलिसांनी मोरीगाव, बारपेटा, गुवाहाटी आणि गोलपारा जिल्ह्यातून 11 जणांना ताब्यात घेतले. ते इस्लामिक कट्टरतावादाशी जोडलेले आहेत (Assam Police detained 11 persons). जागतिक दहशतवादी संघटना अल-कायदा (Al Qaeda) इन इंडियन सबकॉन्टिनेंट (AQIS) आणि अन्सारुल्ला बांग्ला टीम (ABT) यांच्याशी संबंध आहेत. याबाबत पुढील कार्यवाही सुरू आहे.

AQIS/ABT शी संबंध असल्याबद्दल बारपेटा पोलिसांनी कालच आठ जणांना अटक केली आहे. बारपेटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम १७/१८/१८(बी)/१९/२० यूए(पी) कायदा, १९६७ या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटक केलेल्या आठ जणांना आज आसाममधील बारपेटा येथील न्यायालयात हजर केले जाईल असे एसपी अमिताव सिन्हा यांनी सांगितले.

AQIS च्या नजरा भारतावर -अल कायदाची उपशाखा आणि अफगाणिस्तानात कार्यरत असलेली दहशतवादी संघटना AQIS च्या नजरा भारतावर आहेत. संयुक्त राष्ट्राने आपल्या ताज्या अहवालात इशारा दिला होती की AQIS ने मार्च 2020 मध्ये आपल्या मासिकाचे नाव 'नवा-ए-अफगाण जिहाद' वरून बदलून 'नवा-ए-गझवा-ए-हिंद' केले होते. दहशतवादी संघटना भारतात कारवाया वाढवत असल्याचे यावरून दिसून येते. UN च्या प्रतिबंध मॉनिटरिंग अँड अॅनालिसिस टीमच्या 13व्या अहवालानुसार, AQIS अफगाणिस्तानमध्ये ही संघटना दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेली आहे. त्यात 180 ते 400 दहशतवादी आहेत. त्यात भारत, बांगलादेश, म्यानमार, पाकिस्तानचे नागरिक आहेत. हे दहशतवादी गट गझनी, हेलमंड, कंदाहार, निमरुज, पक्तिका, जाबुल या राज्यांमध्ये आहेत. ऑक्टोबर 2015 मध्ये कंदाहारमध्ये अमेरिका आणि अफगाणिस्तानच्या संयुक्त ऑपरेशननंतर ते कमकुवत झाले, परंतु संपले नाहीत. आता आर्थिक मदत मिळणेही त्यांच्या अडचणी वाढले आहे. त्यामुळेच तो आक्रमक वृत्ती दाखवू शकत नाही.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details