गुजरात -गुजरातमधील अपक्ष आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी ( MLA Jignesh Mevani news ) यांना बुधवारी रात्री उशिरा आसाम पोलिसांनी अटक ( Assam Police Arrest Jignesh Mevani ) केली. मेवाणी यांना काल 11.30 च्या सुमारास गुजरातच्या पालमपूर सर्किट हाऊस येथून अटक ( MLA Jignesh Mevani arrest news ) करण्यात आली. मेवाणी यांना काल रात्री अहमदाबाद येथे नेण्यात आले आणि आज त्यांना आसामला नेण्यात येणार असल्याचे समजले आहे.
हेही वाचा -Delhi BJP leader shot dead : दिल्लीतील भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या; पोलिसांकडून तपास सुरू
मेवाणी यांना अटक का करण्यात आली? हे स्पष्ट नाही. मात्र, मेवाणी यांच्या ट्विटर अकाउंटवरील त्यांच्या ट्विट्सवर कारवाई झाल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर, आसाममध्ये जिग्नेश मेवाणी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप एफआयआरची प्रत दिलेली नाही. यावर, माझ्या एका ट्विटसंबंधी माझ्यावर अटकेची कारवाई झाली, तसेच पोलिसांनी याबाबत नेमकी माहिती दिली नाही, असे जिग्नेश मेवाणी यांचे म्हणणे आहे.