आसाममध्ये दुपारी एक वाजेपर्यंत ४८.२४ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
आसाममध्ये दुसऱ्या टप्प्यात 74.79 टक्के मतदानाची नोंद - आसाम विधानसभा निवडणूक मतदान
20:02 April 01
आसाममध्ये दुसऱ्या टप्प्यात 74.79 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
17:45 April 01
सायंकाळी 5.22 वाजेपर्यंत 72.65 टक्के मतदान
16:26 April 01
आसाममध्ये दुसऱ्या टप्प्यात दुपारी 3.30 पर्यंत 63.03 टक्के मतदान
15:19 April 01
आसाममध्ये दुपारी दोनपर्यंत 55 टक्के मतदान..
13:18 April 01
दुपारी एक वाजेपर्यंत ४८.२४ टक्के मतदान..
12:17 April 01
काँग्रेस नेत्या सुश्मिता देव यांनी सिलचरमध्ये केले मतदान..
काँग्रेस नेत्या सुश्मिता देव यांनी सिलचरमध्ये मतदान केले. भाजपाची आघाडी ही 'महाझूठ' आघाडी असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
11:34 April 01
सकाळी अकरापर्यंत २७.५० टक्के मतदान..
राज्यात सकाळी अकरा वाजेपर्यंत २७.५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
11:24 April 01
आसाममध्ये काँग्रेसची ताकद जास्त - संजय राऊत
आसाममध्ये सध्या भाजपा सरकार असले, तरी काँग्रेसही त्यांना जोमाने टक्कर देत आहे. त्यामुळे याच्या निकालाबाबत अंदाज लावणे अवघड असल्याचे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.
10:45 April 01
बदरुद्दीन अजमल यांनी केले मतदान..
ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे अध्यक्ष बदरुद्दीन अजमल यांनी होजाईमध्ये मतदान केले. यावेळी ते म्हणाले, की पंतप्रधान मोदींनी बांगलादेशी घुसखोरांना हाकलण्याचे आश्वासन दिले होते. आतापर्यंत किती घुसखोरांना त्यांनी हाकलले? गेल्या पाच वर्षांमध्ये १०० देखील बांगलादेशी त्यांनी इथून हाकलले नसतील याची मी खात्री देतो, असेही ते म्हणाले.
10:42 April 01
काँग्रेस उमेदवार प्रद्योत कुमार भुयान यांनी केले मतदान..
काँग्रेसचे उमेदवार प्रद्योत कुमार भुयान यांनी नलबारी मतदारसंघामध्ये मतदान केले.
09:29 April 01
सकाळी नऊ वाजेपर्यंत १०.५१ टक्के मतदान..
आसाममध्ये सकाळी १०.५१ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. विधानसभा निवडणुकांसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे.
07:42 April 01
सिलचरमध्येही ईव्हीएम खराब..
सिलचरमध्ये निर्तमोयी बालिका विद्यालयातील मतदान केंद्र क्रमांक १४६ वरील मतदान थांबवण्यात आले आहे. याठिकाणी ईव्हीएम मशीन खराब झाल्यामुळे मतदान तात्पुरते थांबले आहे.
07:33 April 01
नागावमध्ये ईव्हीएम खराब..
नागावमधील लॉ कॉलेजवरील मतदान केंद्रावर नागरिकांची रांग लागली आहे. याठिकाणी ईव्हीएम मशीन खराब असल्यामुळे मतदान उशीरा सुरू होणार आहे.
07:15 April 01
मतदानास सुरुवात..
सकाळी सात वाजेपासून सर्व मतदारसंघामध्ये मतदानास सुरुवात झाली आहे.
06:16 April 01
आसाममध्ये दुसऱ्या टप्प्यात 74.79 टक्के मतदानाची नोंद
दिसपुर :आसाममधील विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडणार आहे. २७ मार्चला पार पडलेल्या पहिल्या टप्प्यामध्ये ७६.८९ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली होती. आज एकूण ३९ मतदारसंघांमध्ये मतदान पार पडेल. सुमारे ७३ लाख मतदार ३४५ उमेदवारांचे भवितव्य निश्चित करतील.
अलगापूर मतदारसंघामध्ये सर्वाधिक (१९) तर उदालगुरी मतदारसंघामध्ये सर्वात कमी (२) उमेदवार उभे आहेत. एकूण मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघांमध्ये रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. तीन किंवा त्याहून जास्त उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल असतील, तर त्या मतदारसंघामध्ये रेड अलर्ट घोषित करण्यात येतो. एकूण ३४५ उमेदवारांपैकी ३७ उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल आहेत. तर, त्यांपैकी ३० उमेदवारांविरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
आसाममध्ये तीन टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. याचा पहिला टप्पा २७ मार्चला पार पडला. दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज, तर तिसऱ्या टप्प्यातील मतदान ६ एप्रिलला होणार आहे. २ मे रोजी मतमोजणी होणार आहे.