महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

MP Demand Ban The Kashmir Files : 'द काश्मीर फाइल्स'वर बंदी घाला; आसामच्या खासदारांची मागणी - खासदार बदरुद्दीन अजमल द काश्मीर फाईल्स बंदी

काश्मिरी पंडितांवरील अत्याचारावर बनलेल्या 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाने पाच दिवसांत ५० कोटींहून अधिक कमाई केली आहे. आसामचे खासदार बदरुद्दीन अजमल (Assam MP Badruddin Ajmal) यांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

Assam MP Badruddin Ajmal
आसामचे खासदार बदरुद्दीन अजमल

By

Published : Mar 16, 2022, 7:20 PM IST

Updated : Mar 16, 2022, 7:32 PM IST

हैदराबाद - काश्मिरी पंडितांवरील अत्याचारावर बनलेल्या 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाने पाच दिवसांत ५० कोटींहून अधिक कमाई केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही या चित्रपटाचे कौतुक केले असले तरी त्याचा विरोधही सुरू झाला आहे. आसामचे खासदार बदरुद्दीन अजमल (Assam MP Badruddin Ajmal) यांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

ANI चे ट्विट

खासदार बदरुद्दीन अजमल यांचे ट्विट -

धुबरी येथील एआययूडीएफ खासदार बदरुद्दीन अजमल यांनी ट्विट केले की, 'मी द काश्मीर फाइल्स बघितला नाही. त्यामुळे जातीय तेढ निर्माण होणार असल्याने केंद्र सरकार आणि आसाम सरकारने या चित्रपटावर बंदी घालावी. आजच्या भारतातील परिस्थिती तशी नाही... आसाममधील नेल्लीच्या घटनेसह काश्मीरमध्ये इतर अनेक घटना घडल्या, पण त्यांच्यावर चित्रपट बनला नाही. बदरुद्दीन म्हणाले की, देशात वेगळ्या प्रकारचे वातावरण निर्माण केले जात आहे.

चित्रपट बघण्यासाठी आसाममधील सरकारी कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी -

आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांनी द काश्मीर फाईल्स हा चित्रपट पाहण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्विट केले की, '#TheKashmirFiles पाहण्यासाठी आमचे सरकारी कर्मचारी अर्ध्या दिवसाच्या विशेष रजेचा हक्कदार असतील हे जाहीर करताना आनंद होत आहे. त्यांना फक्त त्यांच्या वरिष्ठांना कळवावे लागेल आणि दुसऱ्या दिवशी तिकीट जमा करावे लागेल'.

Last Updated : Mar 16, 2022, 7:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details