महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आसाममध्ये 47 जागांसाठी मतदान सुरू, मुख्यमंत्र्यांसह 'या' प्रमुख नेत्यांचे भवितव्य ठरणार - आसाम लेटेस्ट न्यूज

आसाममध्ये पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. आसाममध्ये 47 जागांसाठी आज मतदान होतंय. राज्यातील बहुतांश जागांवर स्पर्धा त्रिकोणी आहे.

आसाम
आसाम

By

Published : Mar 27, 2021, 8:13 AM IST

गुवाहाटी - आसाममधील विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान करण्याचा पहिला टप्पा अनेक मार्गांनी महत्वाचा ठरणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, विधानसभेचे अध्यक्ष हितेंद्रनाथ गोस्वामी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रिपून बोरा आणि राज्य सरकारचे अनेक मंत्र्यांचे भवितव्य ठरणार आहे. राज्य विधानसभेला एकूण 126 जागा आहेत. यासाठी 27 मार्च, 1 एप्रिल आणि 6 एप्रिल रोजी मतदान होणार आहेत. आज पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरवात झाली आहे.

राज्यातील बहुतांश जागांवर स्पर्धा त्रिकोणी आहे. सत्ताधारी भाजपा-एजीपी युती सत्ता कायम ठेवण्यासाठी रिंगणात असताना, विरोधी पक्षांची काँग्रेसप्रणीत युती राज्यात आपली गमावलेली ताकद पुन्हा मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. नव्याने स्थापन झालेला जातिया परिषद निवडणुकीत आपले सामर्थ्य दाखविण्यासाठी प्रयत्नशील आहे.

कोरोनापासून बचाव करण्यासाठी विशेष व्यवस्था -

आजची निवडणुकीत एकूण 264 उमेदवारांचे भवितव्य ठरेल. त्यामध्ये 23 महिला उमेदवार आहेत. मतदान केंद्रांवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आ ली आहे. यामुळे मतदानाची वेळ सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत करण्यात आली आहे.

राज्यात केंद्रीय सैन्याही तैनात -

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य पोलिसांच्या मदतीसाठी केंद्रीय सैन्यानेही तैनात केली आहेत. सर्व मतदान केंद्रांवर सुरक्षेची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षा दले सर्व संवेदनशील आणि सीमावर्ती भागात गस्त घालत आहेत आणि संशयितांवर पाळत वाढविण्यात आली आहे.

11,537 मतदान केंद्रावर 81 लाख 9 हजार 815 मतदार हक्क बजावतील -

आसामधील 12 जिल्ह्यातील 47 जागांवर आज मतदान होणार आहे. या जागांवरील एकूण 11,537 मतदान केंद्रावर 81.09 मतदाता आपला हक्क बजावतील. अपंगांना मतदान केंद्रावर नेण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना व्हील खुर्च्या आणि ई-रिक्षाद्वारे मतदानासाठी आणले जाईल.

तिहेरी स्पर्धा -

आसाममध्ये भाजपा पहिल्या टप्प्यातील 47 पैकी 39 जागा लढवत आहे. तर उर्वरीत जागांवर आसाम गण परिषद 10 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. तर दोन जागांवर मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.

आसाममध्ये काँग्रेसने एआययूडीएफ, बोडोलँड पीपल्स फ्रंट, सीपीआय, सीपीआय (एम), सीपीआय (एमएल), राजद आणि अंचलिक गण मोर्चा या सर्वांसोबत युती केली आहे. हे पक्ष 43 जागा लढवणार आहेत. तर मतदारांसाठी भाजपा आणि काँग्रेस महागठबंधन वगळता तिसरा पर्यायही आहे. मतदारांसाठी तिसरा पर्याय म्हणजे 'जातिया परिषद' गेल्या वर्षी अखिल आसाम विद्यार्थी संघटना आणि आसाम राष्ट्रीय चतुर युवा परिषद परिषदेने याची स्थापना केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details