महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Assam Meghalaya Conflict : आसाम मेघालय बॉर्डरवरील मोकरू गोळीबाराचे प्रकरण सीबीआय कडे - Assam Meghalaya Conflict

आसामचे कॅबिनेट मंत्री जयंता मल्ला बरुआ यांनी माध्यमांना माहिती देताना म्हटले की, "या घटनेची गंभीर दखल घेत आसाम सरकारने हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. (Mokru firing Assam).(Mokru firing case to CBI).

Assam Meghalaya Conflict
Assam Meghalaya Conflict

By

Published : Nov 23, 2022, 8:57 PM IST

गुवाहाटी -आसामचे मुख्यमंत्री डॉ हेमंता बिस्वा सरमा (Hemanta Biswa Sarma) यांनी पश्चिम कार्बी आंगलाँग पोलीस आणि सशस्त्र वन कर्मचाऱ्यांवर मोकरू गोळीबाराच्या (Mokru firing Assam) घटनेचा आरोप केला आहे. या घटनेत मेघालयातील पाच नागरिकांचा मृत्यू झाला होता. आज दिल्लीत पत्रकारांशी बोलताना डॉ सरमा म्हणाले की, "आंदोलक जमावाला पांगवण्यासाठी वन अधिकारी आणि पोलिस कमी गोळ्यांचा वापर करू शकले असते." पश्चिम कार्बी आंगलाँग जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांची बदली करण्यात आली आहे आणि मोकरू गावाच्या अंतर्गत येणाऱ्या जिरीकिंडिंग पोलिस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्याला परिस्थिती नियंत्रणात ठेवता न आल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. हेमंता बिस्वा सरमा यांच्याकडेच आसामचे गृहमंत्रालय आहे.

तपास सीबीआय कडे - आसामचे कॅबिनेट मंत्री जयंता मल्ला बरुआ यांनी माध्यमांना माहिती देताना म्हटले की, "या घटनेची गंभीर दखल घेत आसाम सरकारने हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने न्यायमूर्ती (निवृत्त) रुमी फुकन यांच्या प्रमुखपदी न्यायिक चौकशी समिती स्थापन केली आहे. तसेच पॅनेलला ६० दिवसांत त्यांचे निष्कर्ष सादर करण्याची विनंती करण्यात आली आहे." नवी दिल्ली येथे आज मंत्रिमंडळाची आपत्कालीन बैठक झाली.

घटनेमागे सीमा विवाद असल्याचा आरोप फेटाळला - काल रात्री शिलाँगजवळ बदमाशांनी आसाममध्ये नोंदणीकृत वाहन जाळले होते. मात्र त्यात जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती नाही. विशेष म्हणजे, दोन्ही राज्यांचे प्रशासन घटनेचे स्थळ त्यांच्या राज्यात असल्याचा दावा करत असले तरी, आसाम आणि मेघालयच्या मुख्यमंत्र्यांनी कालच्या गोळीबाराचे कारण सीमा विवाद असल्याचा आरोप स्पष्टपणे फेटाळला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details