महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Firing in Delhi Court : वकिलाच्या वेशात आलेल्या आरोपीचा महिलेवर गोळीबार, महिलेवर उपचार सुरू - आरोपीचा महिलेवर गोळीबार

शुक्रवारी सकाळी गोळीबाराच्या आवाजाने साकेत न्यायालयात एकच खळबळ उडाली आहे. वकिलाच्या वेषात असलेल्या एका व्यक्तीने महिलेवर गोळीबार केला. आरोपींनी महिलेवर 4 गोळ्या झाडल्याची माहिती समोर येत आहे.

दिल्ली साकेत न्यायालय
Firing in Delhi Court

By

Published : Apr 21, 2023, 12:22 PM IST

Updated : Apr 21, 2023, 12:31 PM IST

दिल्ली न्यायालयाबाहेर गोळीबार झाल्याने उडाली खळबळ

नवी दिल्ली : राजधानीतील साकेत न्यायालयात शुक्रवारी सकाळी गोळीबाराच्या आवाजाने एकच गोंधळ उडाला आहे. वकिलाच्या वेशात आलेल्या एका व्यक्तीने महिलेवर गोळीबार केला. जखमी महिलेला तातडीने दिल्ली एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या तिची प्रकृती चिंताजनक आहे. आरोपी हा निलंबित वकील असल्याची माहिती समोर येत आहे. दोघांमध्ये आर्थिक कारणावरून वाद होता. यावरून त्याने महिलेवर गोळीबार केला. सध्या आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा संपूर्ण तपास करत आहेत.

लॉयर्स ब्लॉकजवळ घडलेल्या या घटनेने संपूर्ण न्यायालयात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना घडली त्यावेळी नेहमीप्रमाणे वकील न्यायालयात पोहोचले होते. ब्लॉकच्या आसपास काही वकील येत होते. एंट्री गेटवरील प्रत्येकजण स्कॅनरने स्कॅन केला जात असताना आरोपी थेट पिस्तूल घेऊन न्यायालयात कसा पोहोचला, याचाही पोलीस तपास करत आहेत. यापूर्वी वकील असल्याचा फायदा घेऊन आरोपीने सुरक्षा तपासणी केली नाही. त्यामुळे थेट न्यायालयाच्या आवारात पोहोचल्याची शक्यता आहे का? याचादेखील पोलीस तपास करत आहेत. घटनास्थळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात आहे. गुन्हे शाखेचे पथकही तेथे पोहोचले असून त्यांनी तपास सुरू केला आहे.

महिलेवर एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू-साकेत बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष कर्नेल सिंग यांनी सांगितले की, गोळी लागलेली महिला साकेत कोर्टात कायद्याचा अभ्यास करते. गोळ्या घातलेला व्यक्ती हा निलंबित वकील आहे. तीन महिन्यांपूर्वी दिल्लीच्या बार कौन्सिलने काही कारणास्तव त्याचा परवाना रद्द केला होता. राधा असे जखमी महिलेचे नाव आहे. पैसे देणे-घेण्यावरून आरोपीमध्ये वाद झाला. कामेश्वर प्रसाद सिंग असे गोळीबार करणाऱ्याचे नाव असल्याचे साकेत न्यायालयाचे अध्यक्ष विनोद शर्मा यांनी सांगितले. पैशाच्या व्यवहारावरून त्याचा महिलेशी वाद सुरू होता. ती महिला पैसे परत करत नव्हती. या महिलेवर एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

हेही वाचा-Bihar Fire News : स्टोव्हच्या एका ठिणगीने कुटुंब उद्ध्वस्त.. घरातील पाच जणांचा आगीत मृत्यू

Last Updated : Apr 21, 2023, 12:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details