जयपूर- हैदराबादमधील नेहरू प्राणीसंग्रहालयातील ८ सिंहांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर जयपूरमध्ये सिंह कोरोनाबाधित आढळला आहे. जयमपूरमध्ये सिंहाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे इंडियन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (आयव्हीआरआय) अधिकाऱ्याने सांगितले. त्रिपूर असे कोरोनाचा संसर्ग झालेल्या सिंहाचे नाव आहे.
त्रिपूर या सिंहाला सार्स-कोव्ह-२ या विषाणुची लागण झाली आहे. प्राणीसंग्रहालयातील पँथर, पांढरा वाघ आणि सिंहिणीचे नमुनेही कोरोना चाचणीसाठी घेण्यात आले होते. या चाचणीचे निष्कर्ष आले नसल्याचे आयव्हीआरआयचे संयुक्त संचालक के. पी. सिंह यांनी सांगितले. त्यामुळे या प्राण्यांचे पुन्हा नमुने घेऊन कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. प्राणीसंग्रहालयातील १३ प्राण्यांचे चाचणी अहवाल मिळाले आहेत. त्यामध्ये काही प्राण्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.
हेही वाचा-उत्तराखंड : उशीराने उपचारासाठी दाखल झाल्याने मृत्यूच्या संख्येत वाढ