श्रीनगर (जम्मू आणि कश्मिर): आशिया खंडातील या सर्वात मोठ्या ट्यूलिप बाग रंगीबेरंगी फुलांनी बहरल्यामुळे दल सरोवर आणि जबरवान टेकड्यांदरम्यान वसलेले 'इंदिरा गांधी ट्यूलिप गार्डन' पुढील आठवड्यापासून पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. ट्युलिप गार्डनचे प्रभारी इनाम-उल-रहमान म्हणाले की, 'ट्युलिप गार्डन पर्यटकांसाठी खुले करण्यापूर्वी आम्ही फलोत्पादन, अभियांत्रिकी, बुरशीनाशक उपचार, पोषक फवारणी अशा किरकोळ तयारी करतो आणि ते सुरू आहे. देशभरातील लोकांच्या आकर्षणाचे केंद्र बनलेले हे उद्यान येत्या १९ मार्च रोजी सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहे.
रंगीबेरंगी नजारा दिसणार:संपूर्ण आशिया खंडामधील हे सर्वात मोठे ट्युलिप गार्डन असून, याला सिराज बाग असेही म्हणतात. याठिकाणी विविध रंगांच्या 1.5 दशलक्ष ट्यूलिप्स व्यतिरिक्त, गुलाबी तुरासावा, डॅफोडिल, मस्कारा आणि सायक्लेमेन सारखी इतर वसंत ऋतूची फुले येथील लोकांना आनंदित करणार आहेत. रहमान म्हणाले की, दरवर्षी आम्ही या बागेचा विस्तार करतो आणि येथे नवीन वाण येतात. यावर्षी आम्ही फाउंटन चॅनेलचा विस्तार केला आहे. बागायती व्यावसायिकतेत जगभर आदर्श ठेवायला हवा. यावर्षी पिवळे, लाल, गडद लाल, जांभळे, पांढरे आदी रंगांचे ट्युलिप्स रंगीबेरंगी नजारा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.