महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Rahul Dravid on Ravindra Jadeja : 'वर्ल्ड कप अजून दूर...', रवींद्र जडेजाच्या दुखापतीवर राहुल द्रविडने दिली मोठी अपडेट - राहुल द्रविड

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला ( All-rounder Ravindra Jadeja ) गुडघ्याच्या दुखापतीमुळे आशिया चषकाच्या उर्वरित सामन्यांमधून बाहेर व्हावे लागले. आता जडेजा पुढील काही महिने क्रिकेटपासून दूर राहण्याची शक्यता आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी रवींद्र जडेजाच्या T20 विश्वचषक 2021 मधील उपलब्धतेबाबत मोठा अपडेट दिला आहे.

Ravindra Jadeja
रवींद्र जडेजा

By

Published : Sep 4, 2022, 1:07 PM IST

Updated : Sep 4, 2022, 2:53 PM IST

दुबई:आज (4 सप्टेंबर) आशिया चषक 2022 ( Asia Cup 2022 ) मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. या ब्लॉकबस्टर सामन्यात टीम इंडियाचे भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा खेळू शकणार नाही. तो गुडघ्याच्या दुखापतीमुळे आशिया चषक 2022 स्पर्धेतून बाहेर पडला आहे. तो टी-20 विश्वचषकाला मुकणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यावर टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविडनी महत्वाची अपडेट दिली ( Rahul Dravid Statement on Ravindra Jadeja ) आहे.

द्रविडने जडेजाबाबत केले हे वक्तव्य -

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड पत्रकार परिषदेत ( Head coach Rahul Dravid press conference ) सहभागी झाले होते. यादरम्यान, द्रविडने टी-20 विश्वचषक 2021 मध्ये दुखापतीने त्रस्त अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या उपलब्धतेबाबत एक मोठी अपडेट दिली आहे. राहुल द्रविड म्हणाला की, जडेजाला ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषकातून बाहेर समजणे सध्या तरी योग्य होणार नाही.

राहुल द्रविड म्हणाला, 'रवींद्र जडेजाच्या गुडघ्याला दुखापत ( Ravindra Jadeja's knee injury ) झाली असून तो आशिया कपमधून बाहेर आहे. विश्वचषकाला अजून वेळ आहे. त्यामुळे आम्ही त्याला यातून बाहेर समजू शकत नाही. तो वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. जोपर्यंत आमच्याकडे याविषयी अगदी स्पष्ट चित्र येत नाही, तोपर्यंत तो बाहेर म्हणने किंवा त्याच्यावर जास्त भाष्य करणे योग्य होणार ( Jadeja selection for t20 world cup ) नाही.'

द्रविडला आपल्या संघावर पूर्ण विश्वास -

राहुल द्रविडने सांगितले ( Rahul Dravid on Ravindra Jadeja ) की, संघाचे लक्ष सध्या पाकिस्तानविरुद्धच्या सुपर-4 सामन्यावर आहे, जे रविवारी (4 सप्टेंबर) होणार आहे. द्रविड म्हणाला, 'संघ तयार करण्याचा संपूर्ण उद्देश हा आहे की, ते कोणत्याही परिस्थितीत खेळू शकतात. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर सर्वांचे लक्ष आहे. मला आत्मविश्वास आहे आणि आमच्याकडे खरोखर चांगले गोलंदाजी आक्रमण आहे. प्रत्येकजण प्रयत्न करून यश मिळवण्यासाठी खूप उत्सुक असतो.

जडेजा 3 महिने बाहेर असू शकतो -

हे लक्षात घेण्यासारखे आहे की पीटीआयच्या रिपोर्टमध्ये, रवींद्र जडेजाला टी-20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणे कठीण आहे. जडेजाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असून त्यामुळे तो किमान तीन महिने खेळाबाहेर राहू शकतो. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, 'जडेजाच्या उजव्या गुडघ्याची दुखापत खूप गंभीर आहे. त्याच्यावर मोठी शस्त्रक्रिया करावी लागणार असून तो अनिश्चित काळासाठी क्रिकेटमधून बाहेर राहणार आहे. या वेळी, एनसीए वैद्यकीय पथकाचे मूल्यांकन पाहिले तर, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याच्या पुनरागमनासाठी कोणतीही कालमर्यादा दिली जाऊ शकत नाही.

तथापि, हे 'एंटेरियर क्रूसिएट लिगामेंट ( Anterior cruciate ligament )' चे प्रकरण आहे याची पुष्टी करता येत नाही आणि जडेजाला बरे होण्यासाठी सहा महिन्यांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. पण काही प्रमाणात असे म्हणता येईल की जडेजा किमान तीन महिने खेळाबाहेर असेल. जडेजाला गुडघ्याचा बराच काळ त्रास होत आहे.

जडेजा दुखापतींमुळे त्रस्त -

आशिया चषकापूर्वी आयपीएल 2022 दरम्यान रवींद्र जडेजालाही दुखापत ( Ravindra Jadeja injured ) झाली होती, ज्यामुळे त्याला काही सामन्यांमधून बाहेर व्हावे लागले होते. त्यानंतर जडेजाने इंग्लंड दौऱ्यातून मैदानात पुनरागमन केले. तेव्हापासून तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये धावत आहे. आता त्याची एक्झिट हा टीम इंडियासाठी मोठा धक्का मानला जात आहे. तत्पुर्वी मागील रविवारीच भारताने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला होता, त्यामध्ये जडेजाचे देखील हार्दिका पंड्या प्रमाणे महत्वाचे योगदान होते.

हेही वाचा -Serena Williams US Open farewell : फेअरवेल सामन्यात सेरेना विल्यम्सला टॉमलजानोविककडून पत्करावा लागला पराभव, पाहा तिची कारकिर्द

Last Updated : Sep 4, 2022, 2:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details