दुबई आशिया चषक 2022 Asia Cup 2022 या स्पर्धेला शनिवार पासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील दुसरा सामना कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान संघात होणार आहे. रविवारी म्हणजेच आज दुबई स्टेडियमवर दोन्ही देशांचे संघ आमनेसामने असतील. आज जेव्हा संध्याकाली साडेसातला क्रिकेटचा सामना सुरू होईल तेव्हा उन्हाळ्यात दुबईतील वातावरण वेगळेच रंग दाखवेल. मात्र, सोशल मीडियावर भारत-पाक India vs Pakistan Cricket Match सामन्याबाबत सट्टा लावला जात आहे. एकदा खेळ पुन्हा सुरू झाला की, भारत-पाकिस्तान संघर्षाचा उत्साह चाहत्यांना अधिकच गुंतवून ठेवेल.
आशिया चषकात 14 वेळा भारत-पाकिस्तान IND vs PAK आमनेसामने
भारत-पाकिस्तान आतापर्यंत आशिया चषकात 14 वेळा आमनेसामने 14 times India Pak meet in Asia Cup आले आहेत. त्यापैकी सर्वाधिक 8 सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवता आला आहे. त्याचबरोबर पाकिस्तान संघाला 5 सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच दोन्ही संघातील 1 सामना अनिर्णीत राहिला आहे. तसेच आशिया चषकावर नाव कोरण्यात देखील भारतीय संघ पुढे आहे. आतापर्यंत भारताने 7 वेळा आशिया चषकावर आपले नाव कोरले आहे. त्याचबरोबर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाने दोनवेळा आशिया चषक जिंकला आहे. त्याचबरोबर श्रीलंका संघाने 5 वेळा आशिया चषक पटकावला आहे.
दोन्ही संघांना या खेळाडूंची भासणार उणीव
दोन्ही संघ एकमेकांसमोर येण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र, भारताचा जसप्रीत बुमराह आणि पाकिस्तानचा शाहीन शाह आफ्रिदी Bowler Shaheen Shah Afridi या सामन्यात सहभागी होणार नाहीत. जसप्रीत बुमराह Bowler Jasprit Bumrah पाठीच्या दुखापतीशी झुंज देत आहे, तर शाहीन शाह उजव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्याची अनुपस्थिती पाकिस्तानसाठी एक मोठी कमतरता असेल. 2021 च्या T20 विश्वचषकात 10 विकेटने जिंकलेल्या सामन्यात 'प्लेअर ऑफ द मॅच' ठरला. त्याने चार षटकांमध्ये 3-31 अशी सर्वोत्कृष्ट गोलंदाजीची नोंद केली होती.
बुमराहच्या अनुपस्थितीत या खेळाडूंना संधी