महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Asia Cup 2022 : भारत-पाकिस्तान संघाला आयसीसीचा दणका, या कारणासाठी ठोठावला दंड - क्रिकेटच्या लेटेस्ट न्यूज

आशिया चषक 2022 ( Asia Cup 2022 ) मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रविवारी पार पडला. या सामन्यात दोन्ही संघांना स्लो ओव्हर रेटसाठी मॅच फीच्या 40 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

Ind vs Pak
भारत-पाकिस्तान

By

Published : Aug 31, 2022, 7:19 PM IST

Updated : Aug 31, 2022, 7:42 PM IST

दुबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी सांगितले की, आशिया चषक 2022 च्या अ गटातील सामन्यांमध्ये भारत आणि पाकिस्तानला 'स्लो ओव्हर रेट'साठी मॅच फी पैकी 40 टक्के दंड आकारण्यात आला ( India Pakistan fined for slow over rate ) आहे. रविवारच्या सामन्यात रोहित शर्मा आणि बाबर आझम यांचे संघ आपापल्या दिलेल्या निर्धारित वेळेपेक्षा दोन षटके कमी टाकली होती. त्यामुळे सामना पंचांच्या आयसीसी एलिट पॅनेलचे जेफ क्रो यांनी ही कारवाई केली.

आयसीसीने सांगितले की, खेळाडू आणि खेळाडू सपोर्ट कर्मचार्‍यांसाठीच्या आयसीसी आचारसंहितेच्या कलम 2.22 ( ICC Code of Conduct Section 2.22 ) नुसार, जे किमान ओव्हर-रेटच्या समस्येशी संबंधित आहे. या संदर्भात, खेळाडूंना त्यांच्या संघाने दिलेल्या वेळेत गोलंदाजी न केल्यास त्यांच्या प्रति षटकाच्यानुसार सामना शुल्काच्या 20 टक्के दंड आकारला जातो.

यासाठी दोन्ही कर्णधारांना दोषी ठरवण्यात आले आहे. तसेच दोन्ही कर्णधारांनी आपला अपराध मान्य केला, त्यामुळे या प्रकरणात औपचारिक सुनावणीची गरज नव्हती. मैदानावरील पंच मसुदुर रहमान ( Umpire Masudur Rahman on the field ) आणि रुचिरा पिलियागुरुगे, तृतीय पंच रवींद्र विमलसिरी आणि चौथे पंच गाझी सोहेल यांनी हे आरोप केले.

भारताने आपल्या आशिया चषक मोहिमेला पाकिस्तानवर पाच विकेट्सने विजय मिळवून शानदार सुरुवात केली. हार्दिक पांड्याची अष्टपैलू ( All-rounder Hardik Pandya ) कामगिरी तसेच भुवनेश्वर कुमार, रवींद्र जडेजा आणि विराट कोहली यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाने भारताला विजय मिळवून दिला. त्यामुळे भारताने 5 विकेट्स आणि दोन चेंडू राखून मात केली.

हेही वाचा -Asia Cup 2022 : भारतासाठी आज सोपा पेपर, हाँगकाँग विरुद्ध बेंच स्ट्रेंग्थला संधी मिळण्याची शक्यता

Last Updated : Aug 31, 2022, 7:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details