दुबई : आशिया कप 2022 ( Asia Cup 2022 ) मध्ये भारत आणि पाकिस्तान ( India vs Pakistan ) पुन्हा एकदा भिडणार आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रविवारी (4 सप्टेंबर) होणाऱ्या सामन्याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. या हायव्होल्टेज मॅचमध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद रोहित शर्माच्या ( Captain Rohit Sharma ) हाती असेल. त्याचवेळी बाबर आझम ( Captain Babar Azam ) पाकिस्तानी संघाची धुरा सांभाळणार आहे. मागील रविवारीच भारताने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला होता, त्यामुळे त्यांचा उत्साह खूप उंचावला आहे.
तसेच, जर आपण आशिया चषकाच्या इतिहासावर ( History of Asia Cup ) नजर टाकली तर भारतीय संघ आपल्या शेजारी देशावर नेहमीच भारी पडला आहे. आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकूण 15 सामने झाले आहेत, ज्यामध्ये भारतीय संघाने 9 सामने जिंकले आहेत. त्याचवेळी पाकिस्तान संघाने पाच सामने जिंकले आणि एका सामन्याचा निकाल लागला नाही. आजच्या सामन्यात भारतीय चाहत्यांना त्यांच्या संघाकडून विजयाची अपेक्षा आहे.
भारताला जडेजाची भासणार उणीव -
या सामन्यात भारताला रवींद्र जडेजाची उणीव भासणार ( Ravindra Jadeja will be missed ) आहे, जो दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी अक्षर पटेलला संघात घेण्यात आले आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मागील सामन्यात, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने जडेजाला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले आणि उजव्या आणि डाव्या हाताच्या फलंदाजांचे संयोजन तयार केले. कारण त्या सामन्यात ऋषभ पंतला वगळण्यात आले होते.
रविवारीही कर्णधार रोहित शर्मा आणि द्रविड असाच सट्टा खेळतात का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. डाव्या हाताच्या फलंदाजाचा टॉप-6 फलंदाजांमध्ये समावेश करायचा असेल, तर त्यासाठी फक्त पंत हाच पर्याय आहे. हार्दिक पंड्याच्या अष्टपैलू ( All-rounder Hardik Pandya ) कामगिरीमुळे भारताला पाकिस्तानविरुद्ध शेवटच्या षटकात रोमांचक विजय मिळवून देण्यात मदत झाली. या सामन्यातही रोहितला त्याच्या इतर खेळाडूंकडून त्याच कामगिरीची अपेक्षा असेल. विराट कोहलीला ( Star batsman Virat Kohli ) देखील आपला फॉर्म गवसला आहे.
आशिया कपमधील भारत-पाक सामन्यांचे निकाल:
- 1984: भारत 84 धावांनी विजयी, शारजाह
- 1988: भारत 4 गडी राखून जिंकला, ढाका
- 1995: पाकिस्तान 97 धावांनी विजयी, शारजाह
- 1997: निकाल नाही, कोलंबो
- 2000: पाकिस्तान 44 धावांनी विजयी, ढाका
- 2004: पाकिस्तान 59 धावांनी विजयी, कोलंबो
- 2008: भारत 6 गडी राखून जिंकला, कराची
- 2008: पाकिस्तान 8 विकेट्सने जिंकला, कराची
- 2010: टीम इंडिया 3 गडी राखून जिंकली, दांबुला
- 2012: भारत 6 गडी राखून जिंकला, मीरपूर
- 2014: पाकिस्तान 1 विकेटने जिंकला, मीरपूर
- 2016: भारत 5 गडी राखून जिंकला, मीरपूर
- 2018: भारत 8 गडी राखून विजयी, दुबई
- 2018: भारत 9 गडी राखून विजयी, दुबई
- 2022: भारताचा 5 गडी राखून विजय, दुबई
भारताला झटपट सुरुवात करावी लागेल -