महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Asia Cup 2022 IND vs PAK पाकिस्तानचा डाव आटोपला; भारतासमोर १४८ धावांचे आव्हान - IND vs PAK live match updates

टी-20 विश्वचषक 2021 स्पर्धेनंतर ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा भारत आणि पाकिस्तानचे संघ क्रिकेटच्या मैदानावर भिडत आहेत. यावेळी आशिया चषक 2022 Asia Cup 2022 यूएईमध्ये होत असून, भारत पाकिस्तान सामना India vs Pakistan दुबई स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दोन्ही संघात नाणेफेक पार पडली आहे.

IND vs PAK
IND vs PAK

By

Published : Aug 28, 2022, 7:15 PM IST

Updated : Aug 28, 2022, 9:32 PM IST

दुबई आशिया चषक 2022 Asia Cup 2022 या स्पर्धेला शनिवार पासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील दुसरा सामना कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान India vs Pakistan Cricket Match संघात आज होणार आहे. या सामन्याला दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रात्री साडेसातला सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा Captain Rohit Sharma आणि पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम Captain Babar Azam यांच्यात नाणेफेक पार पडली आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला india won the toss choose to field आहे.

आशिया चषकात 14 वेळा भारत-पाकिस्तान IND vs PAK आमनेसामने

भारत-पाकिस्तान आतापर्यंत आशिया चषकात 14 वेळा आमनेसामने 14 times India Pak meet in Asia Cup आले आहेत. त्यापैकी सर्वाधिक 8 सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवता आला आहे. त्याचबरोबर पाकिस्तान संघाला 5 सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच दोन्ही संघातील 1 सामना अनिर्णीत राहिला आहे. तसेच आशिया चषकावर नाव कोरण्यात देखील भारतीय संघ पुढे आहे. आतापर्यंत भारताने 7 वेळा आशिया चषकावर आपले नाव कोरले आहे. त्याचबरोबर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाने दोनवेळा आशिया चषक जिंकला आहे. त्याचबरोबर श्रीलंका संघाने 5 वेळा आशिया चषक पटकावला आहे.

हवामान आणि खेळपट्टीची स्थिती

गेल्या वर्षीचा विश्वचषक आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यांच्या आधारे दुबईत लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला फायदा झाल्याचे सांगण्यात येते. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला सुरुवातीला काही अडचणी येतात. याशिवाय तिथल्या उष्णतेकडेही सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. रात्रीच्या वेळीही तेथील तापमान 35 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युझवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंग.

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), फखर जमान, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हरिस रौफ आणि शाहनवाज दहनी.

हेही वाचा -Asia Cup 2022 IND vs PAK पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मिळाली गुड न्यूज, घ्या जाणून

Last Updated : Aug 28, 2022, 9:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details