महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

AI Powered Sanchar Saathi Launches : चोराने आयएमईआय बदलला तरी हरवलेला मोबाईल सापडणार, केंद्राकडून 'ही' खास सुविधा सुरू - चोरीला गेलेले मोबाईल फोन

संचार साथी हे एक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित पोर्टल आहे. या पोर्टलच्या माध्यमातून हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाईल फोन ट्रॅक आणि ब्लॉक करता येणार आहेत.

AI Powered Sanchar Saathi Launches
केंद्रीय दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव

By

Published : May 17, 2023, 10:49 AM IST

नवी दिल्ली :जगभरात मोबाईल फोन हरवणे आणि चोरीला जाणे ही साधारण गोष्ट झाली आहे. मात्र आता भारतात मोबाईल चोरीला जाण्यासह हरवलेले मोबाईल शोधण्यास एआयची मदत घेण्यात आली आहे. त्यामुळे एआय ( Artificial Intelligence ) आता नागरिकांचे हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाईल शोधण्यास मदत करणार आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एआयवर आधारीत असलेल्या संचार साथी या पोर्टलचे लाँचींग केले आहे. हरवलेल्या किवा चोरीला गेलेल्य मोबाईलला ब्लॉक करण्यासह ट्रेस करण्यास मदत करणार आहे.

वापरकर्त्यांची सुरक्षा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाच्या संकल्पनेचा अविभाज्य भाग आहे. त्याची हे पोर्टल स्वप्न पूर्ण करत आहे. - अश्विनी वैष्णव केंद्रीय दळणवळण मंत्री

हरवलेला मोबाईल करता येईल ब्लॉक :दूरसंचार विधेयकाच्या मसुद्याचा 'सुरक्षा' हा महत्त्वाचा भाग असल्याची माहिती यावेळी केंद्रीय दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. वापरकर्त्यांची सुरक्षा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाच्या संकल्पनेचा अविभाज्य भाग आहे. त्याची हे पोर्टल स्वप्न पूर्ण करत असल्याचेही वैष्णव यांनी यावेळी सांगितले. संचार साथी पोर्टलचा सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर ( CEIR ) हा पहिला टप्पा असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तुमचा मोबाईल हरवला तर तुम्ही या पोर्टलला भेट देऊ शकता. काही ओळख पडताळणी, उपक्रमाची आवश्यकता असेल. त्यानंतर लगेचच पोर्टल कायदा अंमलबजावणी संस्था आणि दूरसंचार सेवा प्रदात्यांशी संवाद साधेल. त्यानंतर तुमचा हरवलेला मोबाईल ब्लॉक करण्यात येईल, असेही मंत्री वैष्णव यावेळी म्हणाले.

फसवणूक रोखण्यासाठी विकसित केले पोर्टल :मोबाइल फोनचा गैरवापर करून चोरी, बनावट केवायसी, बँकिंग फसवणूक यासारख्या विविध फसवणूक होऊ शकतात. अशा फसवणूक रोखण्यासाठी हे पोर्टल विकसित केल्याची माहिती मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. 'संचार साथी' हे एक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित पोर्टल आहे. ते हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाईल फोन ट्रॅक आणि ब्लॉक करण्यास अनुमती देते. पोर्टलद्वारे मोबाईल वापरकर्त्याला त्याच्या नावावर फसव्या पद्धतीने अधिक कनेक्शन घेतले गेले आहेत का, हे कळू शकते आणि ते ब्लॉकही केले जाऊ शकते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पंतप्रधानांच्या व्हिजनला पुढे नेण्यासाठी केल्या सुधारणा :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनला पुढे नेण्यासाठी आज तीन सुधारणा सादर केल्या जात आहेत. पहिली सुधारणा म्हणजे सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (CEIR), जी देशात कुठेही हरवलेले किंवा चोरीला गेलेले फोन ट्रॅक करुन ब्लॉक करते. दुसरे म्हणजे नो युवर मोबाईल (KYM), यामुळे वापरकर्त्यांना त्यांचा मोबाईल नंबर वापरून लॉग इन करून त्यांच्या नावाने जारी केलेल्या मोबाईल कनेक्शनची संख्या तपासण्याची परवानगी देते. आणि तिसरा म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड फेशियल रिकग्निशन पॉवर्ड सोल्युशन फॉर टेलिकॉम सिम सबस्क्राइबर व्हेरिफिकेशन ( ASTR ) असल्याची माहिती मंत्री वैष्णव यांनी दिली आहे. या पोर्टलच्या मदतीने नवीन सिम कार्ड घेतले गेले असले तरीही डिव्हाइस निष्क्रिय केले जाऊ शकते. डिव्हाइस त्याच्या आयएमईआय (IMEI) द्वारे ट्रॅक केले जाते. मोबाईल वापरकर्त्याला त्याच्या नावावर फसवून अधिक कनेक्शन घेतल्याची माहिती कळू शकते. तिसरे म्हणजे वापरकर्त्याने किती मोबाइल कनेक्शन घेतले आहेत हे सिस्टम तपासू शकते.

व्हॉट्सअ‍ॅपवरील कॉलद्वारे फसवणूक रोखण्यासाठी प्रयत्न :आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरून स्पॅम कॉल्समध्ये अचानक वाढ झाली आहे. ही एक मोठी चिंतेची बाब असून व्हॉट्सअ‍ॅपवरील कॉलद्वारे फसवणूक रोखण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील असेही मंत्री वैष्णव यांनी यावेळी स्पष्ट केले. मेटा मालकीच्या अ‍ॅपने फसवणूकीत गुंतलेल्या कोणत्याही मोबाइल फोन नंबरशी जोडलेल्या सेवा निष्क्रिय करण्यास सहमती दर्शविली आहे. आम्ही व्हाट्सअ‍ॅपशी याबाबत संपर्क केला असून मेटाने ग्राहकांची सुरक्षा सर्वात महत्वाची असल्याचे स्पष्ट केले आहे. सर्व ओटीटी OTT प्लॅटफॉर्मवर फसवणूक करणारे वापरकर्ते आढळल्यास त्यांची नोंदणी रद्द करण्यासाठी सहकार्य करत आहेत. फसवणुकीमुळे ३६ लाख मोबाईल कनेक्शन तोडण्यात आले आहेत. त्याच बरोबर त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप खाते ब्लॉक करण्यात आल्याची माहितीही केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

हेही वाचा -

  1. Bengal Firecracker Factory Blast : पश्चिम बंगालमध्ये विना परवाना फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, 9 जण ठार
  2. World Hypertension Day 2023 : उच्च रक्तदाब घेत आहे घातक रूप, जाणून घ्या कशी घ्यावी काळजी
  3. World Telecommunication Day 2023: एक असे घर जिथे आजही 135 वर्ष जुन्या टेलिफोनवर वाजते ट्रिंग ट्रिंग . . . .

ABOUT THE AUTHOR

...view details