नवी दिल्ली - लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी सुप्रीम कोर्टाने सोमवारी आशिष मिश्राला दिलेला जामीन रद्द केला आहे. आणि त्याला आठवडाभरात आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले. आशिष मिश्रा यांना जामीन रद्द करण्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने (४ एप्रिल)रोजी निर्णय राखून ठेवला होता. ( Ashish Mishra Bail Cancelled ) सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आशिष मिश्रा यांना जामीन देण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले होते. खटला सुरू व्हायचा असताना अनावश्यक तपशीलांमध्ये जाऊ नये असे न्यायालयाने म्हटले होते. सरन्यायाधीश एन व्ही रमना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निकाल सुनावला.
गाडीने चार शेतकऱ्यांना चिरडले होते - 10 मार्च रोजी मुख्य साक्षीदारावर झालेल्या हल्ल्याचा संदर्भ देत शेतकऱ्यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी साक्षीदारांचे संरक्षण सुनिश्चित करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. ( Ashish Mishra Bail Cancelled by SC ) गेल्या वर्षी 3 ऑक्टोबर रोजी, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या या भागात शेतकरी निदर्शने करत असताना उसळलेल्या हिंसाचारात लखीमपूर खेरी येथे आठ जणांचा मृत्यू झाला होता. उत्तर प्रदेश पोलिसांच्या एफआयआरनुसार, एका गाडीने चार शेतकऱ्यांना चिरडले, ज्यामध्ये आशिष मिश्रा बसले होते.
काय आहे प्रकरण -उत्तरप्रदेशमधील लखीमपूर खिरी जिल्ह्यात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर भाजपा कार्यकर्त्यांनी गाडी घातल्याने आठ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण देशभरातून याघटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांचा मुलगा आशिष मिश्र याने शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी गाडी घातल्याचा आरोप केला.