नवी दिल्ली -लखीमपूर खेरीहिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्रा याने लखीमपूर न्यायालयात आत्मसमर्पण केले आहे. आशिष मिश्रा याने आत्मसमर्पण अर्जासोबत सुप्रीम कोर्टाचा आदेशही लागू केला आहे. आत्मसमर्पण केल्यानंतर न्यायालयाने आशिष मिश्रा यांना तुरुंगात पाठवण्याचे आदेश दिले. लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी सुप्रीम कोर्टाने आरोपी आशिष मिश्राचा जामीन रद्द केला. त्यानंतर आठ दिवसांत आत्मसमर्पण करण्याचे नर्देश दिले होते. त्यांनंतर रविवारी (दि. 24 एप्रिल)रोजी मिश्राने कोर्टात आत्मसमर्पण केले आहे.
खंडपीठाने हा निकाल सुनावला - आशिष मिश्रा यांना जामीन रद्द करण्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने (४ एप्रिल)रोजी निर्णय राखून ठेवला होता. ( Ashish Mishra Bail Cancelled ) सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आशिष मिश्रा यांना जामीन देण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले होते. खटला सुरू व्हायचा असताना अनावश्यक तपशीलांमध्ये जाऊ नये असे न्यायालयाने म्हटले होते. सरन्यायाधीश एन.व्ही रमना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निकाल सुनावला आहे.
आशिष मिश्राला तुरुंगात पाठवले - सुप्रीम कोर्टाने गेल्या आठवड्यात आशिष मिश्राचा जामीन रद्द करून त्याला एका आठवड्यात आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले होते, न्यायालयाने 25 एप्रिलपर्यंत मुदत दिली होती. रविवारी, एक आठवड्याचा कालावधी पूर्ण होण्याच्या एक दिवस आधी, मीडियाच्या नजरेतून सुटून आशिष आपले वकील अवधेश सिंग यांच्यासोबत गुप्तपणे सीजेएम कोर्टात पोहोचला. कोर्टात सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा संदर्भ देत आशिष मिश्राच्या वकिलाने अर्ज दाखल केला, ज्यावर कोर्टाने आशिष मिश्राला तुरुंगात पाठवले.
आशिष मिश्रा यांना 68 दिवसांनंतर पुन्हा तुरुंगवास - लखीमपूर खेरी येथे कथितपणे शेतकर्यांना चिरडल्याच्या प्रकरणात आशिष मिश्रा याने आत्मसमर्पण केले आहे. गेल्या आठवड्यात सुप्रीम कोर्टाने मिश्रा यांचा जामीन रद्द केला होता. आशिष मिश्रा हे केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचे पुत्र आहेत. आशिष मिश्रा यांची पुन्हा लखीमपूर खेरी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, 3 ऑक्टोबर 2021 रोजी लखीमपूर खेरी जिल्ह्यातील टिकुनिया येथे शेतकरी आंदोलन करत होते त्यावेळी ही घटना घडली होती.
हेही वाचा -Ashish Mishra Bail Canceled : लखीमपूर खेरी प्रकरणात आशिष मिश्रा यांचा जामीन रद्द