ब्रिसबेन: जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेली महिला टेनिसपटू ऍश्ले बार्टीने बुधवारी निवृत्ती जाहीर ( Tennis player Ashley Barty retires ) केली. याआधीही या ऑस्ट्रेलियन खेळाडूने टेनिसमधून दोन वर्षासाठी ब्रेक घेतला होता. पण आता ती कोर्टवर परतणार नाही. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून तिने ही माहिती दिली आहे. हा निर्णय तिच्या चाहत्यांसाठी धक्कादायक होता. या वर्षाच्या सुरुवातीलाच तिने ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले होते. 44 वर्षांत हे विजेतेपद पटकावणारी ती पहिली ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरली होती. तिची ऑस्ट्रेलियाच्या महान खेळाडूंमध्ये गिणती केली जाते.
बार्टी सध्या जगातील महिला टेनिसपटूंच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत ती इतक्या लवकर निवृत्त होईल, अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. तिच्या या निर्णयाने तिच्या चाहत्यांसोबतच टेनिस जगतातील इतर दिग्गजांनाही आश्चर्य वाटले. तिच्या जवळच्या मित्र आणि पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत बार्टीने जाहीर केले की, ती तिच्या टेनिस करिअरला अलविदा करत आहे. बार्टीने आपल्या टेनिस करिअरमध्ये तीन ग्रँड स्लॅम जेतेपदे पटकावली ( Barty won three Grand Slam titles ) आहेत.