इंदोर -ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते वारिस पठाण यांच्या तोंडावर अज्ञात व्यक्तीने (AIMIM national spokesperson Waris Pathan face turns black) काळे फासले. AIMIM चे प्रवक्ते असलेल्या वारिस पठाण इंदोर मध्ये काही कार्यक्रमांना भेटी देण्यासाठी आले होते. तेथे कार्यक्रमास पोहोचले असता, अज्ञात व्यक्तीने चेहऱ्याला काळे फासले. तेथे पोलीसांनी पोहोचल्यावर परिस्थिती नियंत्रणात आणली.
AIMIMचे राष्ट्रीय प्रवक्ते इंदोरला एक दिवसीय दौऱ्यावर गेले होते. वेळापत्रकानुसार ते मुस्लिम वस्तीत जात होतो. खजराना येथे पोहोचल्यावर ते एका गेटमधून बाहेर पडताना काही लोकांनी त्यांच्या चेहऱ्यावर काळे फासले. त्यांच्याच समाजातील काही लोक वारिस पठाण यांच्या विरोधात घोषणा देत होते. त्यावेळी एका व्यक्तीने राष्ट्रीय प्रवक्त्याच्या तोंडाला काळे फासले आणि तेथून पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वारिस पठाणची तेथून सुटका केली.