नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर असून परिस्थती अत्यंत वाईट झाली आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून मृत्यूचा आकडा वाढतच चालला आहे. यातच कोरोना नियंत्रणासाठी लसीकरण गरजेचे असताना अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. यावरून एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या महलातून बाहेर यावं आणि देशातील नागरिकांची दशा पाहावी, अशी खोचक टीका केली.
एआयएमआयएम सुप्रीमो आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी आपल्या ट्विट पंतप्रधान कार्यालयाला (पीएमओ) टॅग करत मोदींवर हल्लाबोल केला. “खोटे, खोटे आणि खोटे. मोदी सरकार खोटारडेपणावर आधारलेलं आहे. पंतप्रधानांनी ख्वाब-ए-गफलतीतून बाहेर पडावं. महालातून बाहेर येऊन देशातील गरीबांची काय दशा झालीयं हे पाहाव, असे टि्वट असदुद्दीन ओवैसी यांनी केले आहे.