महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मोदी सरकारमध्ये दम असेल तर तालिबानींना दहशतवादी घोषित करावे-असदुद्दीन ओवैसी - Modi should declare Taliban as terrorist

बिहारच्या दौऱ्यावर आलेल्या असदुद्दीन ओवैसी यांनी मोदी सरकार व योगी सरकारवर कठोर शब्दात टीका केली आहे. मोदी सरकारकडून तालिबानच्या बाबत घेण्यात येत असलेल्या भूमिकेबाबत ओवैसी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वाचा सविस्तर.

असदुद्दीन ओवैसी
असदुद्दीन ओवैसी

By

Published : Sep 14, 2021, 5:29 PM IST

Updated : Sep 14, 2021, 9:55 PM IST

पाटणा- एआयएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी तालिबानच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला आव्हान दिले आहे. या सरकारमध्ये दम असेल तर तालिबानला दहशतवादी घोषित करावे, असे ओवैसी यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांनी अब्बा जान म्हणत वादग्रस्त विधान केले होते. प्रतिमा मलीन होत असताना वाचविण्यासाठी योगी खोटे बोलत असल्याचे ओवैसी यांनी म्हटले आहे.

एआयएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांना माध्यमांशी बोलताना योगी सरकार आणि मोदी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, की ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बोलत आहेत, ते संपूर्ण खोटे आहे. अनेक प्रकरणामध्ये लोकांकडे रेशन कार्ड नसल्याचे दिसून आले. योगी सरकारमध्ये अनेक जण भूकबळी ठरत आहेत. तर काही प्रकरणांमध्ये पोलीस हे लोकांवर अत्याचार करत असल्याचे समोर आले आहे.

भारत तालिबानला दहशतवाद्यांच्या यादीत का टाकत नाही?

ओवैसी यांनी तालिबानवरही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हटले, की आमच्यावर सतत संशय व्यक्त करण्यात आलेला आहे. त्याबाबत आम्हाला प्रश्न विचारले जाऊ नयेत. जर मोदी सरकारमध्ये दम असेल तर त्यांनी तालिबानला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करावे. भारत तालिबानला दहशतवाद्यांच्या यादीत का टाकत नाही? त्यांना दहशतवादी घोषित करण्यासाठी का संकोच करत आहे?

मोदी सरकामध्ये दम असेल तर तालिबानींना दहशतवादी घोषित करावे

हेही वाचा-केंद्र सरकार लवकरच फ्लेक्स इंजिन पॉलिसी आणणार - नितीन गडकरी

ओवैसी यांनी विविध मुद्द्यांवर मत व्यक्त केले. विमानाच्या अपहरणात कोणत्या दहशतवाद्याला सोडले होते, यावर भाजपने स्पष्टीकरण द्यावे? कोणत्या दहशतवाद्याला तालिबानकडे सोपविले होते? अफगाणिस्तानात तालिबान आल्याने चीन-पाकिस्तान बळकट होणार आहेत. ही भारतासाठी चिंताजनक बाब आहे. नरेंद्र मोदी सरकारने तालिबानला दहशतवादी करण्याची गरज असल्याचे ओवैसी यांनी म्हटले आहे.

हेही वाचा-दहशतवाद्यांचा ग्रेनेडने पुलावामात सुरक्षा दलावर हल्ला; चार नागरिक जखमी

योगी सरकारवर ओवैसी यांची टीका

अब्बा असे म्हणून योगी सरकार कोणत्या मतांचे ध्रुवीकरण करत आहे? जर कामे केले असती तर अब्बा अब्बा असे ओरडण्याची वेळ आली नसते.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री योगी?

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ एका कार्यक्रमात म्हणाले, की 2017 पूर्वी अब्बा जान म्हणणारे रेशन संपवित होते. एका विशिष्ट धर्माला लक्ष्य करून योगी आदित्यनाथ यांनी टीका केली. कुशीनगरचे रेशन नेपाळ आणि बांग्लादेशमध्ये जात होते. आज कोणी गरिबांचे रेशन घेतले तर त्याला तुरुंगात पाठविले जाईल, असेही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले होते.

हेही वाचा-पंतप्रधानांच्या हस्ते अलीगडमध्ये राजा महेंद्र प्रताप सिंग विद्यापीठाची पायाभरणी; संरक्षण क्षेत्राचेही मिळणार शिक्षण

Last Updated : Sep 14, 2021, 9:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details