शिलाँग (मेघालय) : राज्यपाल फागू चौहान यांच्या हिंदीतील भाषणाच्या निषेधार्थ मेघालयातील विरोधी पक्ष व्हॉइस ऑफ द पीपल पार्टी (व्हीपीपी) च्या आमदारांनी सोमवारी सभात्याग केला. विधानसभेचे अध्यक्ष थॉमस ए संगमा आणि मुख्यमंत्री कॉनराड के संगमा यांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर सांगितले, की राज्यपालांचे इंग्रजी भाषेतील भाषांतरित भाषण वितरित करण्यात आले आहे. त्यांनी इंग्रजी वाचण्यात काही मर्यादा आहेत म्हणून हिंदीतून त्यांनी भाषण केले असही ते म्हणाले आहेत.
अधिकृत भाषा इंग्रजी असल्याचा आग्रह : व्हीपीपी अध्यक्ष आर्डेंट बसाइओवामोइट आणि इतर तीन पक्षाच्या आमदारांनी सभागृहातून सभात्याग केला. आर्डेंट विधानसभेत म्हणाले, 'आम्हाला हिंदी भाषिक राज्यपाल पाठवले आहेत. ते काय बोलत आहेत ते आम्हाला समजले नाही, म्हणून आम्ही बाहेर पडत आहोत. आम्ही कामकाजात भाग होऊ इच्छित नाही. मेघालय विधानसभेची अधिकृत भाषा इंग्रजी असल्याचा आग्रह विरोधी पक्षांच्या आमदारांनी धरला.
असा अनादर होताना पाहून वाईट वाटते : तत्पूर्वी हस्तक्षेप करताना मुख्यमंत्री म्हणाले, 'लिखित भाषण नियमानुसार वितरित करण्यात आले आहे. कोणत्याही व्यक्तीला काही मर्यादा असतात आणि तो इंग्रजी वाचू शकत नाही. असा अनादर होताना पाहून वाईट वाटते अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.