वडोदरा गुजरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव १५ ऑगस्ट रोजी देशभरात राष्ट्रीय भक्तीभावाने साजरा झाला. यासोबतच प्रत्येक शहरात तिरंगा यात्रा काढण्यात आली. त्याचवेळी वडोदरा शहरात गुजरात भाजप सरकारचे राज्यमंत्री राजेंद्र त्रिवेदी यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेत BJP MINISTER TRIRANGA YATRA IN GUJARAT अरविंद केजरीवाल यांचे भाषण ARVIND KEJRIWAL SPEECH वाजले. ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. केजरीवाल यांचा ऑडिओ वाजताच संपूर्ण रॅली काही काळ ठप्प झाली होती. Kejriwals Speech In Tiranga Yatra
तिरंगा यात्रेत डीजेमध्ये चुकून अरविंद केजरीवाल यांचे भाषण वाजले. या तिरंगा यात्रेत मंत्री राजेंद्र त्रिवेदी खासदार महापौर केयुर रोकडिया यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. तिरंगा यात्रेत मंत्री राजेंद्र त्रिवेदी यांच्यासह भाजप नेते हातात तिरंगा घेऊन उभे होते. दरम्यान अचानक डीजेच्या लाऊडस्पीकरमध्ये अरविंद केजरीवाल यांचे भाषण सुरू झाले. केजरीवाल यांचे भाषण चुकून डीजेच्या लाऊडस्पीकरवर वाजल्याने यात्रेत गोंधळ झाला. त्यानंतर लगेचच डीजे यंत्रणा बंद करण्यात आली. आता या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.