महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

काँग्रेस आणि भाजप दोन्ही भ्रष्ट- अरविंद केजरीवाल यांची टीका - etv bharat marathi

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, की जर भाजपची गोवामध्ये सत्ता आली तर आम्ही हिंदुकरिता अयोध्या यात्रा आणि ख्रिश्चनांकरिता मोफत वेलंकणीची यात्रा करणार आहोत. तर मुस्लिमांकरिता अजमेर शरीफची मोफत यात्रा देणार आहोत.

अरविंद केजरीवाल
अरविंद केजरीवाल

By

Published : Nov 1, 2021, 5:22 PM IST

Updated : Nov 1, 2021, 9:40 PM IST

सिंधुदुर्ग/पणजी- काँग्रेस आणि भाजप हे एकत्रित मलई वाटून खाऊ अशा युतीवर काम करत आहेत. सत्तेत आल्यानंतर एकमेकांविरोधात कारवाई करायची नाही, असा दोन्ही पक्षांनी आपआपसात करार केल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस व भाजपवर कडाडून टीका केला आहे. ते पत्रकार परिषेद माध्यमांशी बोलत होता.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, की जर भाजपची गोवामध्ये सत्ता आली तर आम्ही हिंदुकरिता अयोध्या यात्रा आणि ख्रिश्चनांकरिता मोफत वेलंकणीची यात्रा करणार आहोत. तर मुस्लिमांकरिता अजमेर शरीफची मोफत यात्रा देणार आहोत. साईबाबांची भक्तांकरिता शिर्डी यात्रा देणार आहोत.

काँग्रेस आणि भाजप दोन्ही भ्रष्ट

हेही वाचा-थायलंडचे दरवाजे बंद झाल्याने राहुल गांधी पर्यटनासाठी गोव्यात- तेजस्वी सुर्यांचा टोला

पुढे अरविंद केजरीवाल म्हणाले, की काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही भ्रष्ट्र पक्ष आहेत. त्यामुळेच काँग्रेसमध्ये भाजपविरोधात बोलण्याचे धाडस नाही. जर बोलले तर तुरुंगात पाठविण्यात येईल, अशी काँग्रेसला भीती आहे. भाजपची 10 वर्षे सत्ता असताना काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांवर एकही गुन्हा का दाखल झाला नाही?

राज्यपालांच्या टीकेवरूनही अरविंद केजरीवाल यांनी साधला निशाणा

गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मलिक म्हटले होते की, कोविड काळात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला आहे. आपण याला विरोधही केला, मात्र आपल्या विरोधाला न जुमानता राज्यपाल पदावरून आपल्याला हटविण्यात आले. त्यावरूनही अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा-गोव्यात राजकीय घडामोडींना वेग, प्रादेशिक पक्षांची तृणमुलशी युती

गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. नुकतेच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी व तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी गोव्याचा दौरा केला आहे. 2022 मध्ये फेब्रुवारीत गोवा विधानसभेची निवडणूक होणार आहे. आम आदमी पक्षाने गोवा विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. केजरीवाल हे भेटीत गोव्यातील विविध नेते व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

हेही वाचा-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अरविंद केजरीवाल आजपासून गोवा दौऱ्यावर

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे पणजीमध्ये दुचाकीने प्रवास करतानाचा व्हिडिओ 30 ऑक्टोबरला समोर आला. हा व्हिडिओ राहुल यांनी त्यांच्या ट्विटरवरून शेअर करण्यात आला होता.

Last Updated : Nov 1, 2021, 9:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details