नवी दिल्ली Arvind kejriwal On Bjp : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीनं तिसऱ्यांदा समन्स देऊनही ते चौकशीसाठी उपस्थित राहिले नाहीत. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी भाजापावर मोठा आरोप केला आहे. "भाजपाला मला अटक करायचे आहे" असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. त्यामुळं ईडी चौकशीवरुन आता आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्याचं स्पष्ट होत आहे.
भाजपाला मला अटक करायचं आहे :दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी "ईडीनं मला तब्बल तीन वेळा समन्स पाठवलं आहे. मात्र भाजपाला मला अटक करायचं आहे. त्यांना माझी बदनामी करायची आहे. माझ्या प्रामाणिकपणावर हल्ला करायचा आहे. माझ्या वकिलानं ईडीनं पाठवलेलं समन्स बेकायदेशीर असल्याचं मला सांगितलं आहे. त्यामुळं बेकायदेशीर समन्स आल्यावर त्याचं पालन कसं करायचं, योग्य समन्स आल्यास मी पालन करेन" असंही अरविंद केजरीवाल यांनी यावेळी सांगितलं.