महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

AAP will Not leave INDIA Alliance : आम आदमी पार्टी INDIA साठी वचनबद्ध - केजरीवाल - AAP will Not leave India Alliance

AAP will Not leave INDIA Alliance : आम आदमी पार्टी INDIA आघाडीसाठी पूर्णपणे वचनबद्ध असल्याचं म्हटलं आहे. आम आदमी पार्टी इंडिया आघाडीपासून वेगळी नसल्याचं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केलं आहे.

AAP will Not leave India Alliance
AAP will Not leave India Alliance

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 29, 2023, 5:40 PM IST

नई दिल्ली AAP will Not leave India Alliance:पंजाबमधील काँग्रेस आमदाराच्या अटकेनंतर इंडिया आघाडीत सर्व काही अलबेल नसल्याचं दिसून येत आहे. त्यावर आम आदमी पक्षाचे (आप) संयोजक तसंच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी सडेतोड उत्तर दिलंय. पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नावर ते म्हणाले की, आम्ही इंडियाच्या आघाडीला समर्पित आहोत. आम्ही कोणत्याही परिस्थितीत इंडिया आघाडीपासून वेगळे नाही.

जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप अस्पष्ट : ते पुढे म्हणाले की, आमची एकच भूमिका आहे की, देशात अशी व्यवस्था निर्माण करावी की, या देशातील प्रत्येक व्यक्तीला आपण पंतप्रधान आहोत, असं वाटायला हवं. नितीश कुमार यांच्या पीएम पदाबाबत ते म्हणाले की "आम आदमी पार्टी INDIA आघाडीसाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. विरोधी आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप तयार झालेला नसल्यामुळं, याला थोडा वेळ लागेल.

काँग्रेसच्या काही नेत्यांना अटक : पंजाबमध्ये काँग्रेस, आम आदमी पक्ष यांच्यातील तणावाच्या वृत्तावर प्रतिक्रिया देताना केजरीवाल म्हणाले, "पंजाब पोलिसांनी काल काँग्रेसच्या काही नेत्यांना अटक केली आहे. त्याचा तपशील आमच्याकडं नाही. परंतु आम्ही अमली पदार्थांच्या व्यसनाच्या विरोधात लढा पुकारला आहे. कोणत्याही वैयक्तिक प्रकरणावर किंवा व्यक्तीवर भाष्य करत नाही. पण व्यसनमुक्तीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आम आदमी पार्टी, काँग्रेसमध्ये संघर्ष : पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांपासून आम आदमी पार्टी, काँग्रेसमध्ये संघर्ष असल्याचं दिसून येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सर्व 13 लोकसभा जागांवर निवडणूक लढवणार असल्याची विधानं काँग्रेस नेते करत आहेत. आम आदमी पार्टीसोबत कोणतीही जागा वाटून घेण्यास काँग्रेसनं नकार दिलाय. मात्र, आम आदमी पक्ष यावर मौन बाळगून होता. आता यावर अरविंद केजरीवाल यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. दिल्लीतही आम आदमी पार्टी, काँग्रेसमध्ये जागावाटपाबाबत अनेक अंतर्गत चर्चा सुरू आहेत. मात्र आजपर्यंत एकाही नेत्यानं स्पष्ट वक्तव्य केलेलं नाही.

हेही वाचा -

  1. Sharad Pawar in Baramati : रोहित पवारांना आलेल्या नोटीसवर शरद पवारांचे एका वाक्यात उत्तर; वाचा काय म्हणाले...
  2. Raj Thackeray : मराठी महिलेला घर नाकारल्यानंतर राज ठाकरे आक्रमक; म्हणाले, गालावर वळ उठतील
  3. Pankaja Munde : धक्कादायक! पंकजा मुंडेंनाही मराठी असल्यानं मुंबईत घर नाकारलं, इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...

ABOUT THE AUTHOR

...view details