कानपूर (उ. प्र) -हृदयरोगींसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आयआयटी कानपूर या शैक्षणिक संस्थेने कृत्रिम हृदय तयार करण्याच्या उपक्रमाला सुरुवात केली आहे. यासाठी एका टास्क फोर्सची स्थापना देखील करण्यात आली आहे. असे झाल्यास रुग्णांना हृदय प्रत्यारोपणासाठी वाट पाहावी लागणार नाही आणि उपचारावरील खर्च देखील कमी होणार आहे.
हेही वाचा -कोरोना ओमायक्रॉनपेक्षा कमी घातक असल्याचे कोणतेही कारण उपलब्ध नाही - तज्ञ
या पथकामध्ये आईआईटीच्या प्राध्यापकांव्यतिरिक्त यूएसचे अनेक तज्ज्ञ, एम्स, अपोलो, फोर्टिस आणि मेदांताच्या वरिष्ठ तज्ज्ञांचा समावेश आहे. हे पथक कृत्रिम हृदयाला डिव्हाईसच्या स्वरुपात विकसित करण्यात गुंतले आहे. लेफ्ट वेंट्रिकुलर असिस्ट डिव्हाईस ( LVAD ) असे या डिव्हाईसचे नाव ठेवण्यात आले आहे.
अशी सुचली कल्पना
आईआईटी कानपूरचे प्राध्यापक अमिताभ बंदोपाध्याय यांनी सांगितले की, आईआईटी कानपूरच्या वैद्यकीय यशाबाबत एक बैठक सुरू होती. यात संस्थेने कोरोना काळात कमी किमतीत व्हेंटिलेटर आणि चांगले कॉन्सन्ट्रेटर्स तयार करून जगात आपली वेगळी ओळख निर्माण केल्याचे व्यक्त करण्यात आले. यावेळी एकाने आपण कृत्रिम हृदय का तयार करत नाही? असा प्रश्न केला. बस, संस्थेने त्याचवेळी या कल्पनेला आव्हान म्हणून स्विकार केले. कृत्रिम हृदय बनवण्यासाठी तात्काळ टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली.
बाजारात येण्यासाठी लागू शकतात 5 वर्षे
प्राध्यापक अमिताभ बंदोपाध्यायनुसार, जेव्हाही एखादा वैद्यकीय डिव्हाईस तयार केला जातो तेव्हा त्याची अनेक टप्प्यांत चाचणी केली जाते. हा डिव्हाईस तयार व्हायला दोन वर्षे लागतील. त्यानंतर प्राण्यांवर त्याची चाचणी करण्यात येईल. त्यानंतर क्लिनिकल चाचणी होईल. हा डिव्हाईस बाजारात येण्यासाठी जवळपास पाच वर्षांचा कालावधी लागेल.
काय आहे कृत्रिम हृदय?
कृत्रिम हृदय म्हणजे, लेफ्ट वेंट्रिकुलर असिस्ट डिव्हाईस ( LVAD ) एक असा पंप आहे ज्याचा उपयोग अशा हृदयरोगींसाठी केला जातो ज्यांचे हृदय पूर्णत: फेल झालेले आहे आणि तो रुग्ण शेवटच्या स्टेजवर आहे. हे चुंबकीय आधारावर हृदयाप्रमाणे काम करते. या डिव्हाईसमध्ये 8 रिचार्जेबल बॅटरी असतात. याची बॅटरी 12 तासांपर्यंत चालू शकते. आता देशात ज्या कृत्रिम हृदयाचे प्रत्यारोपण होते तो विदेशातून येतो आणि त्याची किंमत खूप अधिक असते. जेव्हा आईआईटी कानपूर या डिव्हाईसला तयार करेल तेव्हा ते खूप स्वस्त होईल. सामान्य माणसांना ते सहज उपलब्ध होऊ शकेल.