महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Artemis Launch postponed इंजिन खराब झाल्यामुळे आर्टेमिस लाँच पुढे ढकलण्यात आले - इंजिन खराब झाल्यामुळे आर्टेमिस लॉंच कॅन्सल

अमेरिकन अंतराळ संस्था नासाची आर्टेमिस १ चंद्र मोहीम पुढे ढकलण्यात आली आहे. रॉकेटचे प्रक्षेपण सोमवारी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६.०३ वाजता होणार होते. मात्र, रॉकेटच्या चार इंजिनांपैकी एका इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे प्रक्षेपणाच्या काही मिनिटापूर्वीच रॉकेटचे उड्डाण थांबवण्यात आले. २ सप्टेंबर रोजी रात्री १०.१८ वाजता रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

Artemis Launch postponed इंजिन खराब झाल्यामुळे आर्टेमिस लाँच पुढे ढकलण्यात आले
Artemis Launch postponed इंजिन खराब झाल्यामुळे आर्टेमिस लाँच पुढे ढकलण्यात आले

By

Published : Aug 29, 2022, 6:25 PM IST

Updated : Aug 29, 2022, 10:49 PM IST

नवी दिल्ली -स्पेस लॉन्च सिस्टम SLS रॉकेटवरील RS 25 इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे नासाचे आर्टेमिस 1 चे आज होणारे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले आहे. रॉकेटच्या चार इंजिनांपैकी एका इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे नासाने स्पष्ट केले आहे. Artemis Launch postponed due to malfunctioning engine जगातील सर्वात शक्तिशाली आणि सर्वात मोठे रॉकेट फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर येथे लॉन्च पॅड 39B वर तैनात करण्यात आले होते.

ANI ट्विट

सरकारने ही मोहीम मागे घेण्याचा निर्णय घेतला नासाची मानवी चंद्र मोहीम अनेक काळापासून रखडत आली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात २०१० मध्ये स्पेस लॉन्च सिस्टम SLS रॉकेट तयार करण्यात आले होते. यावेळी त्यांना नक्षत्र कार्यक्रमाद्वारे अंतराळवीरांना चंद्रावर पाठवायचे होते. परंतु, मोहिमेत अडचणी निर्माण झाल्यामुळे सरकारने ही मोहीम मागे घेण्याचा निर्णय घेतला.

काय आहे रॉकेट - नासाने तयार केलेले हे सर्वात शक्तिशाली रॉकेट आहे. नासाच्या आर्टेमिस मिशनचा हा एक भाग आहे, ज्या अंतर्गत 50 वर्षांनंतर पुन्हा एकदा मानवाला चंद्रावर पाठवण्याची तयारी केली जात आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेआठ वाजता अमेरिकेतील फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरमधून हे रॉकेट अवकाशात जाईल. भारतात त्यावेळी संध्याकाळचे सहा वाजलेले असतील. सुमारे 100 मीटर लांबीच्या SLS चे कार्य पृथ्वीपासून दूर ओरियन नावाची चाचणी कॅप्सूल प्रक्षेपित करणे असेल.

मोहिमेला जे काही धोके आहेत ते दूर करणार तो चंद्राभोवती फिरेल आणि सहा आठवड्यांनंतर प्रशांत महासागरात परत येईल. या रॉकेटची ही पहिलीच मोहीम आहे, ज्यात एकही अंतराळवीर असणार नाही. मात्र, ही मोहीम यशस्वी झाल्यास भविष्यात अंतराळवीरही या रॉकेटच्या सहाय्याने मोहिमेवर जाऊ शकतील. सर्व काही व्यवस्थित राहिल्यास २०२४ पासून मानव पुन्हा एकदा चंद्रावर पाऊल ठेवू शकेल. नासाचे अंतराळवीर रँडी ब्रेस्निक म्हणतात, आम्ही आर्टेमिस-1 मध्ये काय करत आहोत, हे सिद्ध करणे म्हणजे आपण काय करू शकतो आणि आर्टेमिस-2 मानवाच्या मोहिमेला जे काही धोके निर्माण होऊ शकतात ते दूर केले जाऊ शकतात अस ते म्हणाले आहेत.

मोहिमेत विलंबामुळे अब्जावधी डॉलर्सचे नुकसाननासाच्या नव्या नियोजनांतर्गत हे रॉकेट २०१६ मध्ये प्रक्षेपित केले जाणार होते. यानंतर, डोनाल्ड ट्रम्प सरकारने २०१७ मध्ये या मोहिमेला आर्टेमिस मिशन असे अधिकृत नावही दिले. मात्र, २०१९ मध्ये, तत्कालीन नासा प्रशासक जिम ब्रिडेनस्टीन यांनी या मोहिम रद्द करत पुढे ढकलली. एका सरकारी अहवालानुसार नासाच्या मोहिमेत विलंब झाल्यामुळे सरकारचे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान होत असल्याचे समोर आले. तथापि, ट्रंपपासून जो बायडेनपर्यंत, देशाच्या अध्यक्षांनी आर्टेमिस मिशन यशस्वी करण्यासाठी सतत प्रयत्न केले आहेत.

हेही वाचा -मथुरेच्या श्रीकृष्णजन्मभूमी प्रकरणातही व्हिडिओग्राफी सर्वेक्षणाचे न्यायालयाचे आदेश

Last Updated : Aug 29, 2022, 10:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details