भोपाळ -भारत आणि दक्षिण आफ्रिकेत 12 चित्ते देण्यासाठी साम्यंजस्य करार करण्यात आला आहे. त्या करारानुसार मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात फेब्रुवारी महिन्यात 12 चित्ते येणार आहेत. मागील आठवड्यात भारत आणि दक्षिण आफ्रिकेत याबाबतचा करार झाला आहे. विशेष म्हणजे मागच्या वर्षी नामिबियातून भारताने 8 चित्ते आणले आहेत. ते देखील कुनो राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आले आहेत. नवी दिल्ली आणि प्रिटोरिया या दक्षिण आफ्रिकेच्या राजधानीत हा साम्यंजस्य करार करण्यात आला आहे.
एका चित्त्यासाठी 3 हजारडॉलर :चित्ते कुनो राष्ट्रीय उद्यानात आणण्यासाठी भारत दक्षिण आफ्रिकेला 3 हजार अमेरिकन डॉलर देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मध्य प्रदेशातील वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार कुनो राष्ट्रीय उद्यानात या चित्यांना दहा दिवस विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी 10 विलगीकरण बोमा तयार करण्यात आल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. साम्यंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्यामुळे चित्ते येणास उशीर झाल्याची माहितीही या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली आहे.
आरोग्याबाबत चिंता :दक्षिण आफ्रिकेतून हे चित्ते भारतात येणार असल्याने त्यांना आता विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 15 जुलैपासून हे चित्ते वेगळे ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चित्ते दिर्घकाळ विलगीकरणात राहिल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. हे चित्ते त्यांचे फिटनेस गमावण्याची भीतीही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. भारतात आणण्यात येणाऱ्या चित्त्यांपैकी सात नर तर पाच मादी असल्याची माहितीही या अधिकाऱ्यांनी दिली आहे.