महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

चिंताजनक! देशावर 'डेल्टा प्लस' कोरोनाचं संकट; आढळले 40 रुग्ण - डेल्टा प्लस न्यूज

देशात आजपर्यंत 40 रुग्ण 'डेल्टा प्लस'चे आढळले आहेत. यातील सर्वांत जास्त रुग्ण हे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, केरळ आणि तामिळनाडू राज्यात आढळले आहेत. देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट झपाट्याने पसरण्यास 'डेल्टा' व्हेरियंट कारणीभूत ठरला होता. आता तिसरी लाट 'डेल्टा प्लस' व्हेरिएंटमुळे पसरणार असल्याचे बोलले जात आहे.

'डेल्टा प्लस
'डेल्टा प्लस

By

Published : Jun 23, 2021, 12:22 PM IST

नवी दिल्ली -देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची धास्ती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या 'डेल्टा प्लस' व्हेरिएंटमुळे चिंता वाढली आहे. देशात आजपर्यंत 40 रुग्ण 'डेल्टा प्लस'चे आढळले आहेत. यातील सर्वांत जास्त रुग्ण हे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, केरळ आणि तामिळनाडू राज्यात आढळले आहेत. देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट झपाट्याने पसरण्यास 'डेल्टा' व्हेरियंट कारणीभूत ठरला होता. आता तिसरी लाट 'डेल्टा प्लस' व्हेरिएंटमुळे पसरणार असल्याचे बोलले जात आहे.

महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि जळगाव येथे डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले आहेत. या व्यतिरिक्त केरळच्या पलक्कड आणि पठाणमथिट्टा जिल्ह्यात, तर मध्य प्रदेशातील भोपाळ आणि शिवपुरी जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हॅरिएंटचे प्रकार समोर आले आहेत.

डेल्टा प्रकार जगातील 80 देशांमध्ये आहे. तर डेल्टा प्लस हा व्हॅरिएंटसध्या ब्रिटन, अमेरिका, जपान, रशिया, भारत, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, नेपाळ आणि चीन या 9 देशांमध्ये आढळला आहे. भारतीय SARS-CoV-2 जीनोमिक कन्सोर्टियाच्या नुकत्याच झालेल्या निष्कर्षांच्या आधारे महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेश यांना या व्हॅरिएंटबाबत सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्र, केरळ आणि मध्यप्रदेश या राज्यांना डेल्टा प्लस व्हॅरिएंट, या सध्याच्या विषाणू हाताळणीबाबत सल्ला दिला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या तिन्ही राज्यांना पत्र पाठवले आहे. संक्रमणक्षमतेत वाढ, फुप्फुसांच्या पेशींशी संयुग होण्याची अधिक क्षमता आणि मोनोक्लोनल अँटिबॉडी प्रतिसाद कमी होण्याची शक्यता ही या विषाणूच्या स्वरुपाची वैशिष्ट्ये आहेत. रुग्ण संख्या कमी करण्यासाठी गर्दी आणि सार्वजनिक ठिकाणी संचारावर निर्बंध, चाचण्यांची संख्या वाढवणे, संशयित रुग्णांचा माग घेणे हे उपाय केंद्राने राज्यांना सुचवले आहेत. तसेच डेल्टा प्लस व्हॅरिएंटचे रुग्ण आढळलेल्या भागात लसीकरणाला वेग देण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

देशातील कोरोना रुग्णांची स्थिती...

  • एकूण रुग्ण : 3,00,28,709
  • एकूण कोरोनामुक्त रुग्ण : 2,89,94,855
  • एकूण मृत्यू : 3,90,660
  • सक्रिय रुग्ण संख्या : 6,43,194
  • एकूण लसीकरण : 29,46,39,511

ABOUT THE AUTHOR

...view details