महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Helicopter Crashes : अरुणाचलमधील अ‍ॅडव्हान्स लाइट हेलिकॉप्टरला अपघात; अपघाताच्या चौकशीसाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीची स्थापना - लष्कराचे हेलिकॉप्टर

अरुणाचल प्रदेशातील अप्पर सियांग जिल्ह्यात शुक्रवारी पाच जणांना घेऊन जाणारे लष्कराचे हेलिकॉप्टर ( Helicopter Crashes In Arunachal ) कोसळले. घटनास्थळावर आतापर्यंत चार मृतदेह सापडले आहेत. तर अपघाताच्या चौकशीसाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीची स्थापना करण्यात आली आहे.

Helicopter Crashes
Helicopter Crashes

By

Published : Oct 22, 2022, 12:34 PM IST

Updated : Oct 22, 2022, 1:01 PM IST

आसाम :इंडियन आर्मी एव्हिएशन अॅडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर (वेपन सिस्टम इंटिग्रेटेड) - ALH WSI, आसामच्या लिकाबाई येथे शुक्रवारी सकाळी मिगिंग गावाजवळ क्रॅश झाले. काल चार मृतदेह बाहेर काढण्यात आले असून पाचवा मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे लष्कराने म्हटले आहे. ( Helicopter Crashes In Arunachal )

अपघाताच्या चौकशीसाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीची स्थापना :फ्लाइंग ऑपरेशनसाठी हवामान चांगले असल्याचे वृत्त आहे. वैमानिकांचे ALH-WSI वर 600 पेक्षा जास्त एकत्रित उड्डाण तास आणि त्यांच्या दरम्यान 1800 पेक्षा जास्त सेवा उड्डाण तास होते. हे विमान जून 2015 मध्ये सेवेत दाखल झाले होते.अपघातापूर्वी, एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) ला मे डे कॉल आला होता ज्यामध्ये तांत्रिक किंवा यांत्रिक बिघाड सूचित करण्यात आले होते.अपघाताच्या कारणाचा तपास करण्यासाठी तातडीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे याकडे लक्ष असेल. कुटुंबीयांना कळवल्यानंतर जवानांची नावे जाहीर केली जातील. भारतीय लष्कर आपल्या सखोल संवेदना व्यक्त करते आणि शोकाकुल कुटुंबांसोबत खंबीरपणे उभे आहे.

दुर्घटनेत चारजणांचा मृत्यू झाला : अरुणाचल प्रदेशातील अप्पर सियांग जिल्ह्यातील टुटिंग मुख्यालयापासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंगिंग गावाजवळ आज शुक्रवारी सकाळी भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर ( Helicopter Crashes In Arunachal ) कोसळले. या दुर्घटनेत चारजणांचा मृत्यू झाला आहे. एक अद्याप बेपत्ता असून मृतदेह शोधण्याचे काम सुरु असल्याचे Indian army ने म्हटले आहे. ज्या ठिकाणी ही दुघर्टना झाली आहे ते ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही. घटनास्थळी बचावपथक पोहचले असून शोधमोहीम सुरु आहे. घटनास्थळी हेलिकॉप्टरचे अवशेष आढळून आले आहेत. याची अधिक चौकशी सुरु आहे. ( Helicopter Crashes In Arunachal 4 Killed )

या दरम्यान दुर्घटना घडली :अत्याधुनिक कमी वजनाचे हेलिकॉप्टर अरुणाचल प्रदेशच्या अप्पर सियांग जिल्ह्यातील तुटिंग क्षेत्राजवळ आज सकाळी १०.४० च्या सुमारास कोसळले होते. अप्पर सियांगचे पोलीस अधीक्षक जुम्मर बसर यांनी सांगितले होते की, दुर्घटनेचे ठिकाण रस्त्याने जोडलेली नाही. बचाव पथकाला पाठवण्यात आले आहे. लष्कराच्या जवानांना घेऊन जाणारे हे हेलिकॉप्टर नियमित उड्डाण करत होते. या दरम्यान दुर्घटना घडली आहे.

Last Updated : Oct 22, 2022, 1:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details