नवी दिल्ली :संरक्षण मंत्रालयाने सोमवारी महिंद्रा डिफेन्स सिस्टिम्स लिमिटेड (एमडीएसएल) कंपनीसोबत एक हजार कोटींचा करार केला. या करारांतर्गत लष्कराला १,३०० लाईट स्पेशलिस्ट व्हेईकल्स मिळणार आहेत. विशेष म्हणजे ही सर्व वाहने पूर्णपणे भारतीय बनावटीची असणार आहेत.
चार वर्षांमध्ये मिळणार सर्व वाहने..
पुढील चार वर्षांमध्ये ही वाहने बनवून देण्याचे या करारात सांगण्यात आले आहे. लाईट स्पेशलिस्ट व्हेईकल हे आधुनिक लढाऊ वाहन आहे. यारुन मध्यम मशीन गन्स, ऑटोमॅटिक ग्रेनेड लॉंचर आणि अँटी टँक गायडेड मिसाईल्स वाहून नेण्याची क्षमता या वाहनांमध्ये असते, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.