महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Dehradun Rape Case: सैन्य अधिकाऱ्याच्या अल्पवयीन मुलीवर उत्तराखंडमध्ये बलात्कार.. बिहारी युवकावर आरोप - Dehradun Rape Case

उत्तराखंडमधील डेहराडूनमध्ये लष्कराच्या अधिकाऱ्याने बिहारमधील एका तरुणावर आपल्या अल्पवयीन मुलीला वासनेची शिकार बनवल्याचा आरोप केला आहे. आरोपीवर अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन आणि पत्नीसोबत अश्लील कृत्य केल्याचाही आरोप आहे. तक्रार आल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

Army Officer Alleged Misdeeds with Daughter And Son on Youth in Dehradun at Uttarakhand
सैन्य अधिकाऱ्याच्या अल्पवयीन मुलीवर उत्तराखंडमध्ये बलात्कार.. बिहारी युवकावर आरोप

By

Published : Feb 19, 2023, 3:31 PM IST

डेहराडून (उत्तराखंड): उत्तराखंडमध्ये कर्तव्यावर असलेल्या लष्करी अधिकाऱ्याच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, मुलासोबत दुष्कृत्य आणि पत्नीसोबत गैरवर्तन केल्याची घटना ठाणे कॅन्ट परिसरात उघडकीस आली आहे. बिहारमधील एका तरुणावर हा बलात्काराचा आरोप लावण्यात आला आहे. या तरुणाने आर्मी ऑफिसरच्या पत्नीसोबत अश्लील कृत्यही केल्याचा आरोप आहे. आता लष्करी अधिकाऱ्याच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडितेचे कुटुंब मोबाईल अॅपच्या माध्यमातून आरोपीच्या संपर्कात आल्याचे सांगण्यात येत आहे.

सिंगिंग स्टार ऍपद्वारे साधला संपर्क: डेहराडून पोलीस स्टेशन कँट परिसरात राहणाऱ्या एका लष्करी अधिकाऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ज्यामध्ये त्याने सांगितले आहे की, त्याच्या पत्नीने सिंगिंग स्टार मेकिंग नावाचे अॅप डाउनलोड केले होते. त्याची पत्नी अॅपद्वारे तन्वीरच्या संपर्कात आली . तन्वीर अॅपच्या माध्यमातून गाण्याच्या टिप्स देत असे. लष्करी अधिकारी डेहराडूनहून महाराष्ट्रात प्रशिक्षणासाठी गेले. दरम्यान, आर्मी ऑफिसरच्या पत्नीने तनवीरला सरकारी क्वार्टरमध्ये बोलावले. लष्करी अधिकाऱ्याची 15 वर्षांची मुलगी आणि 11 वर्षाचा मुलगाही घरात राहतात.

मुलीवर बलात्कार, पत्नीची छेडछाड:घरी पोहोचल्यानंतर तनवीरने पत्नीसोबत अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली, असा आरोप आहे. मुलांनी विरोध केला असता त्यांना धमक्या देण्यास सुरुवात केली. त्यानंतर मुलीने लष्करी अधिकाऱ्याला फोन करून सर्व माहिती दिली. तरुणाने तिच्या आईसोबत अश्लील कृत्य केल्याचे मुलीने सांगितले. त्याने तिच्यावर बलात्कार आणि भावासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला. लष्करी अधिकारी महाराष्ट्रातून घरी आल्यावर त्यांची मुलगी घाबरली आणि विचारल्यावर तिने सगळं सांगितलं. त्यानंतर लष्करी अधिकाऱ्याने थेट कॅन्ट पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरु:त्याचवेळी पोलीस ठाण्याचे प्रभारी विजय कुमार यांनी सांगितले की, लष्करी अधिकाऱ्याच्या तक्रारीच्या आधारे आरोपी तन्वीरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात गुन्हा करून पसार झालेल्या आरोपीचा शोध आता पोलिसांकडून सुरू आहे. त्यासोबतच या प्रकरणाची सविस्तर चौकशीही करण्यात येत आहे. आरोपी बिहारचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी हा सैन्य अधिकाऱ्याच्या घरी आला तेव्हा हा सैन्य अधिकारी महाराष्ट्रात प्रशिक्षणासाठी आला होता. त्याचदरम्यान आरोपीने संधी साधत त्याच्या मुलीवर बलात्कार केला. आरोपीला अटक केल्यानंतरच या प्रकरणात आणखी खुलासा होऊ शकतो.

हेही वाचा: Arunachal violence: अरुणाचल प्रदेशात हिंसाचार.. पेपर लीक प्रकरणाचा वाद सुरूच.. आंदोलन थांबेना..

ABOUT THE AUTHOR

...view details