महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मराठी पाऊल पडते पुढे...लष्कर प्रमुख नरवणे यांची चीफ ऑफ स्टाफ कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती, CDS होण्याची शक्यता - चीफ ऑफ स्टाफ कमिटी

लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे ( Naravane Takes Charge Chairman Of CSC ) यांनी चीफ ऑफ स्टाफ कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांमध्ये जो प्रमुख असतो, त्या अधिकाऱ्याला ही जबाबदारी दिली जाते.

Army Chief Gen Naravane
मनोज मुकुंद नरवणे

By

Published : Dec 16, 2021, 1:33 PM IST

नवी दिल्ली - लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे ( Naravane Takes Charge Chairman Of CSC ) यांनी चीफ ऑफ स्टाफ कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. लष्कराच्या तिन्ही शाखांच्या प्रमुखांमध्ये वरिष्ठ व्यक्तीला ही जबाबदारी सोपवली जाते. यापूर्वी ही जबाबदारी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांच्याकडे होती. मात्र, 8 डिसेंबर रोजी हेलिकॉप्टर अपघातात ( Bipin Rawat Chopper Crash ) जनरल रावत यांचा मृत्यू झाल्यानंतर तिन्ही प्रमुखांमध्ये सर्वात ज्येष्ठ असल्याने जनरल नरवणे यांना ही जबाबदारी मिळाली आहे. हवाई दलाचे प्रमुख, एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी आणि नौदल प्रमुख आर हरी कुमार हे लष्कराच्या इतर दोन शाखांपेक्षा कनिष्ठ आहेत, त्यामुळे दोघेही हे पद स्वीकारू शकत नाहीत.

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अर्थात सीडीएस पदाच्या निर्मितीपूर्वी लष्कराच्या तिन्ही शाखांमध्ये समन्वयासाठी लष्करात चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्षपद होते. त्यावेळी तीन प्रमुखांपैकी ज्येष्ठ हे पद भूषवत असत. डिसेंबर 2019 मध्ये जेव्हा सरकारने पहिल्यांदा CDS पदासाठी जनरल रावत यांच्या नावाची घोषणा केली होती. तेव्हा CDS सोबत चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे (Chiefs Of Staff Committee) अध्यक्षपदही जनरल बिपिन रावत यांच्याकडे गेले. आता सीडीएसचे पद रिक्त असल्याने जुनी परंपरा पूर्ववत करण्यात आली आहे. जेणेकरून लष्करातील परस्पर समन्वयाच्या कामात कोणतीही अडचण येणार नाही.

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अर्थात सीडीएसची जबाबदारीही लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे देण्याची शक्यता आहे. सेवाज्येष्ठतेचे नियमांनुसार जनरल मनोज मुकुंद नरवणे, नॉर्दन आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल योगेश कुमार जोशी किंवा लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल चंडी प्रसाद मोहंती हे दावेदार आहेत. लेफ्टनंट जनरल जोशी हे भारतीय हवाई दल आणि नौदल प्रमुख या दोन्हींमध्ये वरिष्ठ आहेत.

31 डिसेंबर 2019 रोजी जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्यानंतर 28 वे लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर बिपिन रावत यांची देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यापूर्वी नरवणे हे लष्कर उपप्रमुख म्हणून कार्यरत होते. नरवणे यांनी सप्टेंबर 2019 मध्ये लष्कराचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी लष्कराच्या पूर्व कमांडचे नेतृत्व केले. हे कंमाडो चीनसोबतच्या 4000 किमी लांबीच्या भारतीय सीमेवर लक्ष ठेवण्याचे काम करते. नरवणे यांना एप्रिल 2022 पर्यंत लष्काराचा कारभार पाहावा लागणार आहे.

मुकुंद नरवणे यांच्याविषयी -

मनोज मुकुंद नरवणे (Army Chief Gen Naravane ) मराठमोळे असून मूळचे पुण्यामधील आहेत. नरवणे यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या ‘ज्ञानप्रबोधिनी’ मध्ये झाले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ते जून 1980 मध्ये लष्करात दाखल झाले होते. त्यांचा परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेना पदकाने गौरव झाला आहे. आजवर अनेक पदांची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे.

हेही वाचा -लष्कराचा संयम पाहण्याची घोडचूक करू नका, लष्करप्रमुखांचा चीनला इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details