अमृतसर (पंजाब) : पंजाबच्या काउंटर इंटेलिजन्स (सीआय) पथकाने (Counter Intelligence Squad of Punjab) दोन दिवसांनंतर पुन्हा एकदा शस्त्रास्त्रांची खेप जप्त (Arms Consignment Seized) केली आहे. फिरोजपूर सीमेवरून ही शस्त्रे जप्त (5 AK47 and 5 pistols seized ) करण्यात आली आहेत. डीजीपी गौरव यादव यांनी याला दुजोरा दिला आहे. ही सर्व शस्त्रे पाकिस्तानातून ड्रोनद्वारे भारतीय सीमेवर (Arms Smuggling Through Drones From Pakistan) पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. Arms Smuggling, latest news from Amritsar, Punjab Crime
टिप-ऑफवर कारवाई: मिळालेल्या माहितीनुसार, सीआय अमृतसरच्या टीमला सीमेपलीकडून शस्त्रास्त्रांची खेप असल्याची माहिती मिळाली. इनपुटची पुष्टी झाल्यानंतर, एआयजी सीआय अमृतसर अमरजित सिंग बाजवा यांच्या देखरेखीखाली एक टीम फिरोजपूरला रवाना करण्यात आली. सीआय टीम फिरोजपूरला पोहोचली आणि बीएसएफशी संपर्क साधला. ज्यांनी विहित माहितीसह जागेची झडती घेतली आणि शस्त्रसाठा जप्त केला.