जैसलमेर (राजस्थान): Chanda Kochhar Son Marriage Cancelled: आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडिओकॉनचे वेणुगोपाल धूत यांना सीबीआयने शुक्रवारी अटक Chanda Kochhar and Deepak Kochhar arrest केली. आता या कारवाईमुळे कोचर दाम्पत्याचा मुलगा अर्जुन कोचरचा विवाह रद्द करण्यात Arjun Kochhar lavish wedding cancelled आला. वास्तविक, चंदा कोचर यांचा मुलगा अर्जुनचा लग्नाचा कार्यक्रम जैसलमेरमध्ये 15 ते 18 जानेवारी दरम्यान 2 महागड्या हॉटेलमध्ये होणार होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदा कोचर यांच्या मुलाच्या लग्नासाठी मुंबईतील एका इव्हेंट कंपनीत बुकिंग करण्यात आले होते. या लग्नासाठी मुंबईची इव्हेंट कंपनी बुक करण्यात आली होती. कंपनीने सर्व बुकिंग रद्द केली आहेत.
चंदा आणि दीपक कोचर यांना सीबीआयने शुक्रवारी अटक केली होती. व्हिडिओकॉन समूहाला दिलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कर्जप्रकरणी अटक करण्यात आली ICICI Bank Loan Fraud होती. त्यांच्यावर आरोप आहे की, जेव्हा चंदा कोचर यांनी ICICI बँकेचा पदभार स्वीकारला तेव्हा त्यांनी अनेक व्हिडिओकॉन कंपन्यांना 6 कर्जे दिली. यामध्ये त्या समित्यांच्या मान्यतेने 2 कर्जे देण्यात आली ज्यात स्वतः चंदा कोचर याही सदस्य होत्या. यासोबतच व्हिडिओकॉन समूहाला कर्ज मंजूर करण्यासाठी इतर समित्यांवर प्रभाव टाकल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.