नवी दिल्ली- राजकारणात कुणी कुणाचा कायचमा शत्रू नाही. खोतकरांना आज नाष्टा आणि चहा पाण्याचे निमंत्रण दिले होते, असे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले. जालन्यात जाऊन भूमिका स्पष्ट करणार, असल्याचे अर्जुन खोतकर यांनी सांगितले.
शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवेंची दिल्लीमध्ये भेट घेतली आहे. याबाबत रावसाहेब दानवे म्हणाले, की, राजकारणात कुणी कुणाचा कायचमा शत्रू नाही. खोतकरांना आज नाष्टा आणि चहा पाण्याचे निमंत्रण दिले होते, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. जालन्यात जाऊन भूमिका स्पष्ट करणार, असल्याचे अर्जुन खोतकर यांनी सांगितले.
जालनामध्ये शिवसेनेला भगदाड -शिवसेनेचे उपनेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर ( Former Minister Arjun Khotkar ) यांनी दिल्लीत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यांच्या उपस्थितीत शिंदे गटात जाहीर प्रवेश केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या बातमीमुळे जालना जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील शिवसेनेला जबर धक्का पोहचला आहे. निष्ठावंत असल्याने खोतकर यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे उपनेतेपद बहाल केले होते. मात्र, आज दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत खोतकर यांनी जाहीर प्रवेश केल्याचे बोलले जात आहे.
भेटीदरम्यान रावसाहेब दानवेंनी केले स्वागत : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी खोतकर यांना पेढा भरवून त्यांचे शिंदे गटात स्वागत केले आहे. दोन दिवसांपूर्वीच खोतकर यांनी आपण ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ असून शिंदे गटात कधीही जाणार नाही, असा दावा केला होता. मात्र, आज शिंदे गटात खोतकर यांनी प्रवेश केल्यास हा जिल्ह्यातील शिवसेनेला मोठा धक्का मानला जाणार आहे.