महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कार्यकारणीची बैठकीत गेहलोत अन् आनंद शर्मा यांच्यात खडाजंगी - congress cwc meet news

काँग्रेसचे वरिष्ठ नेता आनंद शर्मा आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यात वाद झाल्याची माहिती आहे. बैठकीत आनंद शर्मा यांनी पक्षाध्यक्षांसह सीडब्ल्यूसीसाठी अंतर्गत निवडणूक घेण्यावर जास्त भर दिला. यावेळी अशोक गेहलोत भडकले.

अशोक गहलोत
अशोक गहलोत

By

Published : Jan 22, 2021, 4:25 PM IST

नवी दिल्ली - आज काँग्रेसच्या कार्यकारणीची बैठक पार पडली. यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेता आनंद शर्मा आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यात वाद झाल्याची माहिती आहे. काँग्रेस अध्यक्षपद निवड आणि सीडब्ल्यूसीसाठी अंतर्गत निवडणूक घेण्यावर आनंद शर्मा यांनी जोर दिला. यावेळी अशोक गेहलोत भडकले.

बैठकीत आनंद शर्मा यांनी पक्षाध्यक्षांसह सीडब्ल्यूसीसाठी अंतर्गत निवडणूक घेण्यावर जास्त भर दिला. यावरून अशोक गहलोत यांनी देशात आणखी काही महत्त्वपूर्ण बाबी आहेत. ज्यावर आपण लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, असं म्हटलं. तसेच हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर तुम्हाला विश्वास नाही का, असा सवाल त्यांनी केला. गेहलोत यांनी कोणाचेही नाव न घेता ही टिप्पणी केली. या दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अंबिका सोनी यांनीही गहलोत यांचे समर्थन केले.

सीडब्ल्यूसीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाच राज्यांमधील निवडणुकांचे वेळापत्रक लक्षात घेऊन संघटनात्मक निवडणुकांची तारीख निश्चित करण्यासाठी अधिकृत केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details