मेरठ : बिग बॉस फेम अर्चना गौतमने आज बुधवार जाहीर केले की ती काही वर्षांसाठी फक्त तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करणार आहे. त्यामुळे राजकारणापासून दूर राहणार आहे. काही दिवसांपुर्वी अर्चनाने विधानसभा निवडणूक लढवून हस्तिनापूरला द्रौपदीच्या शापापासून मुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. पण, आता या अभिनेत्रीने राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी मायानगरीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना तीने ही माहिती दिली आहे. अभिनेत्रीचे वडील गौतम बुद्ध यांनीही ईटीव्ही भारतशी संवाद साधताना आपल्या मुलीच्या निर्णयाची माहिती दिली आहे.
मुलीकडे खूप काम आहेत : २०२२ मध्ये काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवून प्रसिद्धीझोतात आलेल्या मेरठच्या हस्तिनापूर भागातील रहिवासी असलेल्या चित्रपट अभिनेत्री, मॉडेल आणि अभिनेत्री अर्चना गौतमने आता काही वर्षे राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ती राजकारण टाळत असल्याचं अर्चनाने म्हटलं आहे. आता पूर्ण लक्ष फक्त फिल्मनगरीवर ठेवायचे आहे. अभिनेत्रीचे वडील गौतम बुद्ध म्हणाले की, बिग बॉस शोनंतर त्यांच्या मुलीकडे खूप काम आहे. ते म्हणाले की आता त्यांची मुलगी येणारा बराच काळ व्यस्त असणार आहे. बिग बॉसनंतर तीला सतत वेगवेगळे प्रोजेक्ट मिळत आहेत असही ते म्हणाले आहेत.