नवी दिल्ली - केंद्र सरकारकडून फोन हॅकिंग होत असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. केंद्र सरकारकडून मोबाईल आणि ई-मेल हॅक झाल्याचा आरोप तृणमुलच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी केला. त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, अॅपल कंपनीकडून मला अलर्ट मिळाला आहे. भारत सरकारकडून माझा फोन आणि ई-मेल आयडी हॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
- महुआ मोइत्रा यांनी गृहमंत्रालयाला एक्स सोशल मीडियात टॅग करत गंभीर आरोप केला. महुआ यांनी म्हटलं की, अदानी आणि पंतप्रधान कार्यालयाच्या लोकाकडून मला धमकाविण्याचा आणि घाबरविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मला त्यांची दया येत आहे. शिवसेना ( उद्धव ठाकरे गट) आणि इंडियाच्या काही नेत्यांना अॅपल कंपनीकडून अलर्ट मिळाले आहेत.
काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनादेखील मोबाईलवर अलर्ट आला आहे. यासंदर्भात त्यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यांनी म्हटलं की, माझ्यासारख्या करदात्यांच्या पैशातून काही कमी रोजगार असलेल्या अधिकाऱ्यांना कामात व्यस्त ठेवण्यात येत असल्यानं आनंद आहे. त्या अधिकाऱ्यांना काही महत्त्वाचं करण्यासारखं काम नाही का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित होत आहे.