विशाखापट्टणम ( आंध्र प्रदेश )-सिंहाद्री उर्फ संजू ( AP Youtuber Simhadri ) हा आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम जिल्ह्यातील गजुवाका येथे राहणारा युट्यूबर आहे. सर्व तरुणांप्रमाणे त्यालाही ( Dream Bike of youtber ) दुचाकीचे वेड आहे. त्याने पंसतीची दुचाकी घेतानाही वापरलेला फंडा हा चर्चेत आला आहे.
युट्युबर सिंहाद्रीला हिरो कंपनीची एक्सप्लोसिव्ह 4V स्पोर्ट्स बाईक ( Youtuber buy Sports bike ) घ्यायची होती. त्यासाठी तो पैसे जमा करत होता. त्याच्याकडे 1.60 लाख रुपये जमा झाल्यानंतर त्याने काहीतरी वेगळे करण्याचा विचार केला. त्याने एक रुपयाच्या नाण्यांनी दुचाकी ( buy bike with rupee coins ) खरेदी करण्याचा निर्णय घेतला. शोरूम मालकाची आधीच ओळख असल्याने त्यांचे मन वळवायला ( youtuber Simhadri video ) काहीच हरकत नव्हती. शोरूमच्या मालकाचेही बँकेशी बोलणे झाले. अखेर शोरुम मालकाने एक रुपयांची नाणी स्वीकारण्याची तयारी दाखविली.
एक रुपयाच्या नाण्यांनी भरलेल्या पिशवीत एकूण 1.60 लाख रुपये घेऊन सिंहाद्री हा शोरूममध्ये पोहोचला. सिंहाद्रीला त्याची अखेर दुचाकी मिळाली. शोरूमचे मालक अली खान यांनी सांगितले की, सिंहाद्री आणि त्याच्या मित्रांशी मैत्री आहे. नाणी मोजणे अवघड काम असल्याचे शोरूमच्या मालकाने सांगितले. दोन वर्षांपूर्वी दुचाकी खरेदी कल्पना सुचल्याचे सिंहाद्री यांनी सांगितले. हे एक आव्हानात्मक काम होते. तरीही कठोर परिश्रमाने उद्दिष्ट पूर्ण केल्याचे सिंहाद्रीने सांगितले.