मुंबई/नवी दिल्ली :निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे ( Suspended police officer Sachin Waze ) यांना दिल्ली उच्च न्यायालयाने झटका दिला आहे. युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानुसार कारवाई करण्याचे निर्देश गृह विभागाने दिले होते या विरोधात कारवाई करण्यात येऊ नये तसेच गृह विभागाचे आदेश रद्द करण्यात यावे या मागणीसाठी दाखल करण्यात आलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे त्यामुळे सचिन वाझे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ( Antilia Bomb Scare Case Delhi )
याचिका फेटाळून लावली : दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी मुंबईचे माजी पोलीस शिपाई सचिन वाझे यांनी अँटिलिया बॉम्ब स्कायर प्रकरणाशी संबंधित बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा यूएपीए अंतर्गत खटला चालवण्यास दिलेल्या परवानगीला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली आहे. मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार ठेवल्याच्या कथित भूमिकेसाठी तसेच ऑटो पार्ट्स डीलर हिरेन मनसुख यांच्या हत्येप्रकरणी वाझे यांच्यावर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये गृह मंत्रालयाने खटला चालवण्यास परवानगी दिली होती. ही परवानगी रद्द करण्यात यावी याकरिता दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर न्यायमूर्ती मुक्ता गुप्ता आणि न्यायमूर्ती अनिश दयाल यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली आहे.
सचिन वाझे यांचा युक्तिवाद : या प्रकरणात सर्वकाही मुंबईत घडले आहे त्यामुळे केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयासमोर याचिका कायम ठेवण्यावर प्राथमिक आक्षेप घेतला होता म्हणून या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयच या याचिकेवर सुनावणी करू शकते. असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे.निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी असा युक्तिवाद केला होता की दिल्ली उच्च न्यायालयाला या विषयावर प्रादेशिक अधिकार क्षेत्र आहे कारण दिल्लीत असलेल्या केंद्रीय गृह मंत्रालयाने या प्रकरणात खटला सुरू करण्यासंदर्भात आदेश दिले होता. दिल्ली उच्च न्यायालयाच्या 2009 च्या खंडपीठाने दिलेला निकाल हा खटला हाताळण्याचा अधिकार देतो आणि सर्वोच्च न्यायालयाने तो निकाल कायम ठेवला आहे. असे देखील सचिन वाझे च्या वतीने युक्तिवादात म्हणण्यात आले होते.
काय आहे प्रकरण :उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओ गाडीत 25 फेब्रुवारी 2021 रोजी स्फोटकं सापडली होती. जिलेटीन स्फोटकाच्या 20 कांड्या या गाडीत सापडल्याची माहिती महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती.हा परिसर गावदेवी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो. या घटनेची माहिती मिळताच संबंधित पथके घटनास्थळी दाखल झाली. तिथे तपास केल्यानंतर जिलेटीनच्या 20 कांड्या स्कॉर्पिओ गाडीत सापडल्या होत्या. मुंबईतील पेडर रोडवर अँटिलिया हे मुकेश अंबानी यांचे निवासस्थान आहे. हा मुंबईतील उच्चभ्रू परिसर मानला जातो. स्फोटकांनी भरलेली गाडी ज्यांच्या ताब्यात होती त्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह विधिमंडळ अधिवेशन सुरू असतानाच आढळला आणि प्रकरण आणखीनच चिघळले. मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीत 50-60 फूट आत मातीत रूतला होता. क्रेनच्या मदतीने मृतदेह काढण्यात आला. मृतदेहावर खूप माती लागली होती. शरीरात पाणी आणि माती गेल्याचा संशय आहे. मृतदेहाच्या चेहऱ्यावर कानटोपीसारखे मास्क होते. त्यात 3-4 रुमाल होते. हे रुमाल पोलिसांनी जप्त केले होते.