महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Jubilee hills minor gang rape case : हैदराबादमधील अल्पवयीन सामूहिक बलात्कार प्रकरणात फरार तीन आरोपींना अटक - ज्युबली हिल्स अल्पवयीन सामूहिक बलात्कार

पोलिसांनी शोध घेतला असता फरार असलेले तीन आरोपी ( three accused arrested in Karnataka ) कर्नाटकात सापडले. हैदराबाद पश्चिम झोन टास्क फोर्स पोलिसांनी कर्नाटकात जाऊन आज इतर तीन आरोपींना अटक केली. शाळकरी मुलांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलांनी मर्सिडीज कारमध्ये हे कृत्य केले आहे. पीडित मुलगी एका पार्टीसाठी पबमध्ये गेली होती. यावेळी तिची भेट या आरोपी मुलांसोबत झाली होती.

Jubilee hills minor gang rape case
सामूहिक बलात्कार प्रकरण

By

Published : Jun 4, 2022, 2:54 PM IST

हैदराबाद -ज्युबली हिल्स येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आणखी तिघांना अटक करण्यात ( Jubilee hills minor gang rape case ) आली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या पाच आरोपीपैकी तीन अल्पवयीन आहेत, असे हैदराबाद वेस्ट झोन टास्क फोर्स पोलिसांनी ( Hyderabad west zone task force police ) सांगितले. पोलिसांनी आरोपी सादुद्दीन मलिकला अटक केली आहे. आज सकाळी हैदराबादमध्ये एका अल्पवयीन मुलाला अटक केली.

पोलिसांनी शोध घेतला असता फरार असलेले तीन आरोपी ( three accused arrested in Karnataka ) कर्नाटकात सापडले. हैदराबाद पश्चिम झोन टास्क फोर्स पोलिसांनी कर्नाटकात जाऊन आज इतर तीन आरोपींना अटक केली. शाळकरी मुलांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलांनी मर्सिडीज कारमध्ये हे कृत्य केले आहे. पीडित मुलगी एका पार्टीसाठी पबमध्ये गेली होती. यावेळी तिची भेट या आरोपी मुलांसोबत झाली होती. आरोपी हे विद्यार्थी असून अकरावी, बारावीत शिकत आहेत. यातील पाच जणांची ओळख पटली आहे. यातील तीन आरोपी अल्पवयीन आहेत. एका आरोपीला 3 तारखेला तर दुसऱ्या आरोपीला 4 तारखेला सकाळी अटक केली आहे.

पीडितेची पबमध्ये आरोपीबरोबर झाली होती ओळख-सदुद्दीन मलिक असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 4 तारखेला सकाळी आणखी एकाला अटक केली आहे. शनिवारी संध्याकाळी 17 वर्षीय मुलगी आपल्या मित्रासोबत पबमध्ये गेली होती. यावेळी तिचा मित्र तिथून लवकर निघाला होता. यानंतर तिची आरोपींमधील एका मुलासोबत ओळख झाली. घरी सोडतो असे अल्पवयीन मुलगी त्याच्यासोबत तेथून निघाली होती. यावेळी त्याचे मित्रही सोबत होते.

पार्टीला गेली होती मुलगी - पीडित मुलीच्या मित्रांनी अॅम्नेशिया अँड इन्सोम्निया पबमध्ये 28 मे रोजी एक पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला पीडितेलाही आमंत्रित केले होते. पीडिता पार्टीला गेल्यानंतर तिथे तिची आरोपींबरोबर ओळख झाली. पार्टीनंतर संध्याकाळी 5.30 वाजता घरी जाण्यासाठी निघाली. पबमध्ये भेटलेल्या या आरोपींनी तिला घरी सोडतो, असे सांगून कारमध्ये बसण्यास सांगितले. या कारमध्ये आधीच 3-4 मुलं बसली होती. यानंतर आरोपी गाडी एका निर्जन स्थळी घेऊन गेले. त्यानंतर आधी मुलीला मारहाण केली. मग अत्याचार केला. मुलीच्या शरीरावर जखमांच्या खुणाही असल्याचे वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे. आरोपी गुन्हा करण्याआधी एका पेस्ट्री शॉपमध्ये गेले होते.

हेही वाचा-साकीनाका बलात्कार प्रकरण : पोलिसांनी चोखपणे आपले कर्तव्य बजावल्याने न्याय प्रक्रियेला गती मिळाली - गृहमंत्री

हेही वाचा-Hyderbad Gang Rape Case : हैदराबाद बलात्कार प्रकरणात दोघांना अटक; तीन अल्पवयीन

हेही वाचा-जुहू परिसरातील बलात्कार आणि खून प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा

ABOUT THE AUTHOR

...view details